नवी दिल्ली - सरकारी बँक कर्मचारी वेतनवाढीच्या मागणीसाठी बुधवारी संपावर जाणार आहेत. यासंदर्भात सोमवारी भारतीय बँक संघासोबत कर्मचारी संघाची बैठक निष्फळ ठरली.
याआधीही वाटाघाटी फिस्कटल्यामुळे कर्मचाऱ्यांनी १० व ११ फेब्रुवारी रोजी संप केला होता. भारतीय स्टेट बँकेसह इतर बँकांचे कर्मचारी संपावर असल्यामुळे ग्राहक त्रस्त होतील. संघटनेने २५ टक्क्यांऐवजी २३ टक्के वाढीची मागणी केली असल्याचे युनायटेड फोरमचे संयोजक एम. व्ही. मुरली यांनी सांगितले.
संपाची कारणे
- २३ टक्के वेतनवाढ देण्याची बँक कर्मचा-यांची मागणी
- बँक व्यवस्थापन ११ % वाढीस तयार
- नोव्हेंबर २०१२ पासून होणार वेतनवाढ
बँकांवर परिणाम कसा?
- देशात सार्वजनिक क्षेत्रात २७ बँका आहेत
- यामध्ये जवळपास आठ लाख कर्मचारी कार्यरत
- बँकिंग व्यवसायात यांचा वाटा ७० टक्के.