आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मल्ल्यांना सरकारने हजर करावे, कोर्टाचे निर्देश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सन २०१२ मधील एका चेक बाउन्स प्रकरणात किंगफिशरचे मालक विजय मल्ल्या यांच्यावर दिल्लीतील एका न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. मल्ल्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी सरकार व संबंधित यंत्रणांनी तातडीने कारवाई करावी, अशा कडक शब्दांत निर्देशही न्यायालयाने दिले.न्यायदंडाधिकारी सुमीत आनंद यांनी मल्ल्यांना ४ नोव्हेंबरला हजर करण्याचे आदेश दिले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने अजामीनपात्र वॉरंट मल्ल्यांपर्यंत पोहचवण्याची व्यवस्था करावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

मल्ल्या सध्या लंडनमध्ये असल्याचे स्पष्ट होत आहे. वारंवार आदेश देऊनही ते अद्याप न्यायालयात हजर झालेले नाहीत. यामुळे सरकारी यंत्रणांनी हस्तक्षेप करून त्याना हजर करण्याची व्यवस्था करावी, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले.‘डायल’च्या तक्रारीवरून न्यायालयाने मल्ल्यांना समन्स काढले असून इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन या कंपनीकडे आहे. मल्ल्यांच्या किंगफिशर एअरलाईन्स या कंपनीने २२ फेब्रुवारी २०१२ रोजी दिलेला चेक महिन्यानंतरही वठला नाही. या कंपनीने जून २०१२ मध्ये ७.५ कोटी रुपयांच्या अशा चेक बाऊन्स प्रकरणी चार तक्रारी दाखल करून खटले भरले. या विमानतळाने दिलेल्या सेवेसाठी किंगफिशरने हे चेक संबंधित कंपनीला दिले होते. मात्र, यातील एकही चेक वठू शकला नव्हता. त्यानंतरच्या काळात मल्ल्यांनी देश सोडला. अशा हजारो कोटींच्या प्रकरणांत भारतीय तपास यंत्रणांना मल्ल्या हवे आहेत.
बातम्या आणखी आहेत...