आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंत्र्यांच्या रिपोर्ट कार्डवर सरकार शेरा देणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्व मंत्र्यांनी त्यांच्या विभागाचे रिपोर्ट कार्ड जनतेसमोर सादर केले आहे. त्याचा अभ्यास करून सरकार त्यावर शेरा देणार आहे. मंत्र्यांनी त्यांच्या खात्याची कामगिरी कितपत प्रभावीपणे सादर केली, याचेही सरकार आकलन करणार असून त्याची जबाबदारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणींवर सोपवली आहे.

सूत्रांनी सांगितले की, मंत्र्यांची कामगिरी तपासण्यासाठी पत्रकार परिषदेचे व्हिडिओ फुटेज, दैनिकांमध्ये प्रकाशित बातम्यांचा अभ्यास केला जाणार आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज इतर मंत्र्यांच्या तुलनेत आघाडीवर अाहेत. सुषमा स्वराज यांनी सर्व मंत्र्यांवर पंतप्रधानांचे िनयंत्रण असल्याचे वृत्त उत्तम तर्कांच्या आधारे फेटाळून लावले. त्या म्हणाल्या की, पंतप्रधान कुणालाच धाकात किंवा नियंत्रणात ठेवत नाहीत तर मग मला कशामुळे ठेवतील? त्याचबरोबर मोदींची विदेश नीती व परराष्ट्र मंत्रालयाची उपलब्धीही उत्तमपणे सादर केली. दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद हेही याबाबतीत आघाडीवर आहेत. त्यांनी दावा केला होता की त्यांचे मंत्रालय वर्षभरात दलालमुक्त होईल. त्यांनी चांगल्या योजनांची घोषणाही केली आहे. विशेषत: बीएसएनएलची फ्री रोमिंग, देशव्यापी मोबाइल क्रमांक पोर्टेबिलिटी, कॉल ड्रॉपवर ग्राहकांना लाभ देण्याची घोषणा केली.

पीआयबीची भूमिकाही महत्त्वपूर्ण
मंत्र्यांच्या रिपोर्ट कार्डशी संबंधित प्रक्रियेत पत्र सूचना विभागाच्या (पीआयबी) कामगिरीचेही कौतुक झाले आहे. या विभागाचे प्रमुख फ्रँक नरोन्हा यांच्या भूमिकेचाही विशेष उल्लेख झाला. मंत्र्यांनी सांगितले की, सर्व पत्रकारांची नावे लक्षात ठेवणे खूप कठीण जाते; परंतु त्यांच्यामुळे आम्हाला सर्व पत्रकारांची नावे लक्षात ठेवणे सोपे गेले. कारण पीआयबीने सर्व खुर्च्यांच्या पुढच्या बाजूला पहिल्यांदाच नंबर बोर्डाची व्यवस्था केली. त्यामुळे सर्व मंत्र्यांना पत्रकार, मीडियाला संबोधित करताना सोपे झाले. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनीही पीआयबीच्या या उपक्रमाचा विशेष उल्लेख केला.