आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्राकडून अतिदक्षतेचा इशारा, IS चा 5 राज्यांत शिरकाव असण्याची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दहशतवादी संघटन इस्लामिक स्टेटशी संलग्न ‘लोन वुल्फ अटॅक’चे दहशतवादी भारतावर हल्ला करू शकतात. यासंदर्भात केंद्र सरकारने राज्य सरकारांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. हल्ल्यांची सर्वात अधिक शक्यता प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आहे.
यासंबंधी गृहमंत्र्यांनी नुकतीच उच्चाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर सजगतेचा इशारा राज्यांना देण्यात आला. आयसिसच्या ऑनलाइन कारवाया वाढत आहेत. केंद्राने ‘लोन वुल्फ अॅटॅक’ देशात सक्रिय असल्याचा संशय वर्तवला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आयसिसच्या धमकीत तथ्य आहे. आमच्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनाला देशात कोठेही हल्ल्याची शक्यता आहे.’ यंदा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आयसिसच्या भयाचे सावट राहणार आहे. संरक्षण व्यवस्थेवर याचा दबाव आहे.
आयएसचा ५ राज्यांत शिरकाव असण्याची शक्यता
देशातील ५ राज्यांत आयसिसचा धोका संभवतो. केंद्र सरकार यांचा समावेश १३ राज्यांच्या समूहात करण्याच्या तयारीत आहे. सूत्रांनुसार या समूहात गुजरात, झारखंड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि हरियाणा नव्या राज्यांत सामील होऊ शकतात. उत्तर प्रदेश, केरळ, जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश, तेलंगण, बिहार, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्ली पूर्वीपासूनच यात आहेत.