नवी दिल्ली- संसद भवन, राष्ट्रपती भवन आणि पीएमओसारख्या व्हीआयपी परिसरात माकडांनी उच्छाद मांडला आहे. या भटक्या माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी केंद्र सरकारने अनोखी शक्कल लढवली आहे. आधी वानराच्या मदतीने माकडांना हुसकावून लावले जात होते. आता मात्र माकडांना पळवण्यासाठी 40 कर्मचार्यांची करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे कर्मचारी वानरची वेशभूषा धारण करून माकडांना हुसकावून लावण्याचे काम करतात, असल्याची माहिती शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी सभागृहात दिली.
माकडे आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. नायडू म्हणाले, नवी दिल्ली महापालिकेने (एनडीएमसी) सध्या 40 प्रशिक्षित तरुणांची मानधनावर नेमणूक केली आहे. सर्व तरुण वानरची वेशभूषा धारण करून माकडांमध्ये भीती निर्माण करून त्यांना पळवून लावतात. याशिवाय एनडीएमसीने माकडांना घाबरवण्यासाटी 'श्योर शॉट रबर बुलेट बंदूका'ही सज्ज ठेवल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, केंद्र सरकारने सज्ज ठेवलीय वानराच्या वेशभूषेत चाळीस तरुणांची टीम...
(वरील छायाचित्र सादरीकरण वापरण्यात आले आहे)