आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Has Hired 40 People To Tackle With Monkey Menance Near Parliament

माणसांच्या ‘मर्कटलीला’ पाहून माकडे पळाली; वानरांच्या उच्छादावर मनपाचा नामी उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - माकडे माणसारखे चाळे करताना आपण नेहमी पाहतो. परंतु आता माणसे अगदी हुबेहूब माकडासारखे चाळे करून खर्‍या माकडांना हुसकावताना राजधानीत दिसतील.
दिल्लीतील संसद भवन परिसर, राष्ट्रपती भवन आणि आसपासच्या व्हीआयपी भागात सध्या माकडांनी उच्छाद मांडला आहे. त्यांच्या मर्कटलीला आवरायच्या तरी कशा? यावर महापालिकेने एक नामी उपाय शोधला. प्रशिक्षित तरुणांना हुबेहूब माकडासारखे सजवून खर्‍या माकडांना हुसकावून लावले जात आहे. माकडांची टोळी या भागात दाखल झाली की त्याची माहिती मिळायचा अवकाश, तरुणांची वानरसेवा तातडीने संबंधित भागांत पोहोचते. माकडांना माकडउडी घेत हुसकावून लावले जाते. सरकारी कार्यालय, मंत्रालय असो किंवा अधिकार्‍यांची घरे, कुणीही तक्रार नोंदवली की महापालिकेची वानरसेवा सज्ज होते.

अशी आहे कार्यपद्धती! : जेथून तक्रारी आलेली असते त्या भागात जाऊन हे 40 तरुण अगोदर पाहणी करतात. माकडांची संख्या किती आहे हे पाहिल्यावर मग हे तरुण त्यांच्यासारखेच आवाज काढायला सुरुवात करतात आणि नंतर त्यांना हुसकावून लावतात.

40 तरुणांची फौज
राजधानीतील मानवी वस्त्यांमध्ये कायम उच्छाद मांडणार्‍या या माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेने 40 तरुणांची ही फौज उभारली आहे. त्यांना माकडांसारखीच शेपटी आणि त्याच रंगांची वेशभूषा करून खर्‍या माकडांच्या अंगावर सोडले जाते. या चतुर आणि हुशार वेगळ्या जातीच्या (माणसेच ती!) विचित्र माकडांना घाबरून खरी माकडे धूम ठोकतात.