आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादसह देशातील ४६ सौरशहरांचा मास्टर प्लॅन तयार, नांदेड, नागपूर, शिर्डीचा समावेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात सौरऊर्जेला चालना देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला असून सौरशहरे म्हणून विकसित करण्यासाठी देशातील ५० शहरे निश्चित झाली असून त्यापैकी औरंगाबाद व नांदेड, नागपूर, शिर्डी आणि ठाणे व कल्याण-डोंबिलवलीसह देशातील ४६ शहरांचा बृहत आराखडा (मास्टर प्लॅन) तयार झालेला आहे. देशातील ६० शहरांचा सौरशहरे म्हणून विकास करण्याची सरकारचा प्रस्ताव होता. त्यापैकी ५० शहरे निश्चितही करून ४६ शहरांचा बृहत
आराखडाही केला आहे.
या शहरांचाही समावेश
आग्रा, मुरादाबाद, गांधीनगर, सुरत, राजकोट, इंदूर, भोपाळ, रिवा, ग्वाल्हेर, शिमला, जोधपूर, लुधियाना, अमृतसर, गोपेश्वर, चमोली, हरिद्वार, ऋषिकेश आणि नवी दिल्ली.