आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Is Going To Cancel Lalit Modi's Passport

ललित मोदींना बसणार धक्का, सरकार Passport रद्द करण्याच्या तयारीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो : शरद पवार आणि सुषमा स्वराज यांच्याबरोबर ललित मोदी. - Divya Marathi
फाईल फोटो : शरद पवार आणि सुषमा स्वराज यांच्याबरोबर ललित मोदी.
नवी दिल्ली - सुषमा स्वराज यांच्या मदतीने प्रवासी व्हिसा मिळवल्यामुळे चर्चेत आलेले आयपीएलचे माजी कमिश्नर ललित मोदी यांचा पासपोर्ट रद्द केला जाण्याची शक्यता आहे. टाईम्स नाऊ वृत्तवाहिनीने त्यांच्या एका रिपोर्टमध्ये तसा दावा केला आहे. या रिपोर्टनुसार परराष्ट्र मंत्रालय पासपोर्ट रद्द करण्याची तयारी करत आहे. एवढेच नाही तर, मंत्रालय पासपोर्ट प्रकरणात दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टातही जाण्याची शक्यता आहे.

ललित मोदींनी केला स्वराज यांचा बचाव
ललित मोदी यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा बचाव केला आहे. युपीए सरकारच्या काळातही तीन मंत्र्यांशी आपले चांगले संबंध असल्याचा दावा त्यांनी केला आहे. एका इंग्रजी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदी म्हणाले की, ''माझे अनेक नेत्यांबरोबर चांगले संबंध आहेत. काँग्रेसचे नेते राजीव शुक्ला स्वतः माझी मदत करू इच्छित होते. त्याशिवाय शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांच्याशीही माझी चांगली मैत्री होती, असे मोदी म्हणाले. विशेष म्हणजे हे तिघेही युपीए सरकारमध्ये मंत्री होते. दरम्यान मोदींनी, अंमलबजावणी संचलनालय (ईडी)ला त्यांच्यावरूल आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे.

शुक्ला म्हणाले, मोदींशी बोललो नाही, पवारांनी केला मोदींचा बचाव
ललित मोदींनी शुक्ला यांनी मदतीची ऑफर दिल्याचा दावा केला असला तरी, राजीव शुक्ला यांनी मात्र त्यांचे म्हणणे फेटाळले आहे. ते म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून माझी मोदींशी काहीही चर्चा झालेली नाही. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी ललित मोदींना भारतात येऊन त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यायला हवी, असे म्हटले आहे.