आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government May Declare 10 Percent DA For Employees

रात्री पेट्रोल पंप बंद ठेवण्‍याचा सल्‍ला जनतेचाच- वीरप्‍पा मोईलींचे घुमजाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- केंद्रीय कर्मचा-यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सणासुदीच्या तोंडावर केंद्रीय कर्मचा-यांचा महागाई भत्ता 10 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. यासंदर्भात लवकरच घोषणा होण्‍याची शक्‍यता आहे. महागाई भत्त्यात वाढ होण्‍याची खुषखबर मिळणार आहे. केंद्र सरकार रात्रीच्‍यावेळी पेट्रोल पंप बंद ठेवण्‍याचा प्रस्‍तावही रद्द झाला आहे. त्‍यामुळे नागरिकांना हा मोठा दिलासा मिळाला आहे.

पेट्रोल पंप रात्री बंद ठेवण्‍याची कल्‍पना सरकारची नसून जनतेकडूनच असा सल्‍ला देण्‍यात आला होता, असे पेट्रोलियम मंत्री वीरप्‍पा मोईली यांनी स्‍पष्‍ट केले. पत्रकारांसोबत बोलताना त्‍यांनी सांगितले, की आम्‍ही इंधनावरील खर्च कमी करण्‍यासंदर्भात अनेक पर्यायांचा विचार करत आहोत. अनेक कल्‍पना सुचविण्‍यात येत आहे. ही कल्‍पनाही जनतेकडून सुचविण्‍यात आली होती. परंतु, असा कोणताही निर्णय घेण्‍यात आलेला नाही, असे मोईली यांनी स्‍पष्‍ट केले. सरकार 16 सप्‍टेंबरपासून इंधन बचतीबाबत व्‍यापक मोहिम हाती घेणार आहे.

इंधनाचा वापर कमी व्हावा यासाठी रात्रीच्या वेळी पेट्रोल पंप बंद ठेवण्यावर सरकारने विचार केला होता. परंतु, हा प्रस्‍ताव रद्द करण्‍यात आला आहे. पेट्रोलियम मंत्री एम. वीरप्पा मोईली यांनी यासंदर्भात पंतप्रधानांकडे प्रस्‍ताव दिला होता. तेलाच्या वाढत्या आयात बिलात कपात करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना विचाराधीन आहेत. त्यात रात्री पंप बंद ठेवण्याचाही समावेश होता. इंधनाच्या मागणीत 3 टक्के कपात व्हावी यासाठी 16 सप्टेंबरपासून व्यापक इंधन संरक्षण मोहीम सुरू करण्यात येत असल्याचे मोईली यांनी सांगितले. यामुळे विदेशी चलनात 2.5 अब्ज डॉलर किंवा 16 हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकेल.

केंद्रीय कर्मचा-यांना मिळणार 10 टक्‍के महागाई भत्ता.... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...