आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Plans Bill To Make Marriage Laws Women Friendly

घटस्फोटिता, मुलांना पतीच्या स्थावर संपत्तीत वाटा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्र सरकारने विवाह कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करण्याची तयारी केली आहे. प्रस्तावित कायद्यांतर्गत घटस्फोट झाल्यास पतीच्या स्थावर मालमत्तेत पत्नी मुलाबाळांनाही वाटा मिळेल.
केंद्रीय विधी मंत्रालयाने विवाह कायदा (दुरुस्ती) विधेयकावर कॅबिनेट नोट तयार केली आहे. त्यावर विविध मंत्रालयांचा सल्लाही मागवण्यात आला आहे. फीडबॅक मिळाल्यानंतर नवनियुक्त कायदामंत्री डी.व्ही. सदानंद गौडा हे हा मसुदा अंतिम मंजुरीसाठी कॅबिनेटसमोर मांडतील. मसुद्यातील तरतुदींनुसार घटस्फोटांच्या प्रलंबित प्रकरणांचा वेगाने निपटारा करण्यासाठी कोर्टाचे अधिकारही वाढवण्यात आले आहेत.

विधेयकानुसार, घटस्फोटासाठी कोर्टाची पायरी जोडप्याला कमाल तीन वर्षांच्या आत एक संयुक्त अर्ज दाखल करावा लागेल. त्यावर दोन्ही बाजूंची सहमती (घटस्फोटासाठी) द्यावी लागेल. असे झाल्यास न्यायालये स्वत: अापला निकाल देऊ शकतील. मात्र संयुक्त अर्ज दाखल केलेला असल्यास पती-पत्नीसाठी ते १८ महिन्यांचा वेटिंग पीरियड कायम राहील.