आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Plans To Introduce Alternative Travel Options

समुद्रात विमानाबरोबरच बस आणि हायवेलगत हेलिपॅड मोदी सरकारच्या विचाराधीन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लवकरच आपल्याला गंगेच्या किना-यावर सी प्लेन उभे दिसतील. तसेच देशाच्या विविध हायवेंवर हेलिपॅड तयार केले जातील. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल आणि वाहतुकीचा ताण कमी करण्यासही मदत मिळू शकेल. सरकार सध्या वाहतुकीच्या पारंपरिक पद्धतींच्या एक पाऊल पुढे टाकण्याच्या तयारीत आहे. सी-प्लेन ऑपरेशन, नद्यांमध्ये प्रवासी जहाजे आणि राष्ट्रीय महामार्गांवर हेलिपॅड बनवण्याचा सरकारचा प्रस्ताव असून केवळ मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. या प्रस्तावानुसार अलाहाबाद-वाराणसी दरम्यान गंगा किंवा दिल्लीच्या यमुना नदीच्या किना-यावर टर्मिनल तयार करुन छोटे सी प्लेन चालवले जातील. या नव्या पर्यायाने अनेक लहान मोठी गावे (बेटे) जोडली जाऊ शकतील. तसेच हायवेवर हेलिपॅड बनवल्याने वाहतुकीचा वेग अधिक वाढू शकेल.
एवढेच नाही तर केंद्र सरकार पाण्यावर चालणा-या एम्फीबियन बस (ज्या रस्ता आणि नदी दोन्ही ठिकाणी चालतात) च्या वापराच्या शक्यता आजमावून पाहत आहे. त्यामुळे मुंबईसारख्या समुद्र किना-यावर वसलेल्या शहरांत वाहतुकीची कोंडी कमी करण्यात मदत होऊ शकते.
सी प्लेनला मंजुरी
मुंबई पोर्ट ट्रस्टला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मदतीने सी-प्लेन सुरू करण्याची मंजुरी मिळाली आहे. देशाच्या सर्व 12 प्रमुख बेटांवरून अशी सेवा सुरू केली जाण्याची योजना आखली जात आहे. ही सेवा देशाच्या 200 छोट्या पोर्टस्वरही सुरू केली जाईल.
(फोटो प्रतिकात्मक)
पुढे वाचा, जलमार्ग बनवण्याची योजना...