आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल अॅपच्या माध्यमातूनही काढता येतील ‘ईपीएफ’चे पैसे; 4 कोटी सदस्यांना फायदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- निवृत्तिवेतन संस्था ईपीएफओचे सुमारे चार कोटी सदस्य लवकरच मोबाइल फोनच्या माध्यमातून आता पीएफचे पैसे काढू शकणार आहेत. यासाठी त्यांना “उमंग’ मोबाइल अॅपचा वापर करावा लागणार आहे. सदस्याच्या ऑनलाइन विनंतीवर ऑनलाइन पैसे देण्याची व्यवस्था आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) करत आहे.
 
ही सुविधा कधी सुरू होणार या विषयी अद्याप निश्चित माहिती देण्यात आलेली नाही. कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी लोकसभेत ही माहिती दिली आहे. या सुविधेसाठी ईपीएफओ मोबाइल अॅप “उमंग’ (युनिफाइट मोबाइल अॅप फॉर न्यू एज गव्हर्नन्स) विकसित करत असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
ईपीएफओ कडे पीएफचे पैसे काढण्यासाठी  सुमारे एक कोटी अर्ज येतात. ईपीएफओने देशभरातील १२३ पैकी ११० विभागीय कार्यालयांच्या सेंट्रल सर्व्हरला जोडले असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ही सेवा सुरू करण्यासाठी ही तांत्रिक बाब पूर्ण होणे आवश्यक आहे. याच वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला मुख्य पीएफ आयुक्तांनी सांगितले होते की, “ सर्व विभागीय कार्यालयांना सेंट्रल सर्व्हरशी जोडण्याचे काम प्रगतिपथावर आहे. याच वर्षाच्या मे महिन्यापासून आम्ही पीएफ काढणे आणि निवृत्तिवेतन यासह सर्व प्रकारचे अर्ज आणि क्लेमसाठी ऑनलाइन व्यवस्था सुरू करणार आहोत.’

तीन तासांत क्लेम  
सदस्याने पीएफ काढण्यासाठी अर्ज केल्यानंतर तीन तासांच्या आत त्याच्या दाव्याचा निपटारा करण्याची ईपीएफओची महत्त्वाकांक्षी योजना आहे. सध्या पीएफ काढण्यासाठी किंवा निवृत्ती वेतनासाठी दावा करण्याचा अर्ज मिळाल्यानंतर २० दिवसाच्या आत त्याच्या अर्जाचा निपटारा करावा लागतो. ईपीएफओने आपल्या तंत्रज्ञानाला अपग्रेड करण्यासाठी सी-डॅक पुणे यांना तांत्रिक कन्सल्टंट म्हणून नियुक्त केले असल्याची माहिती कामगार मंत्र्यांनी सभागृहात दिली. ही संस्था दिल्ली, गुडगाव आणि सिकंदराबाबतमधील तीन विभागीय डाटा सेंटरवर अत्याधुनिक उपकरणे लावत आहेत.

आधारशी जोडली १.६८ कोटी खाती 
दत्तात्रेय यांनी सांगितले की, ३१ मार्च २०१६ पर्यंत ३.७६ कोटी पीएफ सदस्यांपैकी १.६८ कोटी सदस्यांनी त्यांचे खाते आधार क्रमांकाशी जोडले आहे. ईपीएफओ सदस्यांसाठी आयएएससी कोडसोबतच बँक खात्याचा क्रमांक आणि आधार क्रमांक देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...