आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Raising Age Limit For Tobacco Consumption From 18 To 25 Years

18 नव्हे तर 25 व्या वर्षानंतर करता येईल धुम्रपान, दंडामध्येही होणार वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो-प्रतिकात्मक)
नवी दिल्ली - धुम्रपान करणा-यांसाठी एक वाईट बातमी आहे. सरकारने धुम्रपानासाठीच्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आधी ठरवण्यात आलेली वयोमर्यादा 18 वरुन वाढवून 25 वर्ष करण्याचा विचार आहे. सरकारच्या मते अशा प्रकारच्या निर्णयामुळे तंबाखूचा वापर कमी होईल. तसेच त्यामुळे होणारे नुकसानही कमी होऊ शकेल. त्यापूर्वी अर्थसंकल्पातही सरकारने तंबाखूजन्य उत्पादनांवरील कर वाढवला होता.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारसमोर देशभरात तंबाखू उत्पादनांवर बंदी लावण्याचा प्रस्तावही आहे. तसेच सिगारेटच्या पाकिटावरील बँडींगवरही बंदी लावण्यात येण्याची शक्यता आहे. वयोमर्यादा वाढवण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणा-यांवर आकारण्यात येणा-या दंडाच्या रकमेमध्येही वाढ केला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी गेल्या महिन्यात एका समितीची स्थापना केली होती. सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादन कायदा 2003 मध्ये बदल सुचवण्याची जबाबदारी या समितीवर आहे. सुत्रांच्या मते ही समिती या महिन्याच्या अखेरीपर्यंत आपला अहवाल सादर करू शकते. त्यात वरील शिफासरी केल्या जाण्याची शक्यता आहे.

सुप्रीम कोर्टाची नोटीस
सुप्रीम कोर्टाने गेल्या आठवड्यातच केंद्र आणि सर्व राज्यांना नोटीस पाठवल्या आहेत. कोर्टाने देशातील शिक्षण संस्थांच्या आसपास सिगारेट आणि बीडीचा वापर आणि विक्रीवर बंदी लावण्याची मागणी करणा-या एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना ही नोटीस जारी केली होती. 6 वर्षांपूर्वी सार्वजनिक ठिकाणांवर धुम्रपानास बंदी लावण्यात आली होती.