आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्र काढणार काँग्रेस नेत्यांची सुरक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकार महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेणार आहे. यूपीए सरकारने 150 पेक्षा अधिक लोकांना व्हीआयपी संरक्षण दिले होते. यात बहुतांश काँग्रेसचेच नेते होते. दरम्यान, गृहमंत्रालयाने भाजपचे सरचिटणीस अमित शाह यांना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. गृहमंत्रालयाच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, सरकार व्हीआयपी संरक्षणातील व्यक्तींची यादी कमी करू इच्छित आहे. मात्र अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. गृहसचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती व्हीआयपींना असलेल्या धोक्यानुसार संरक्षणाचा आढावा घेते.
श्रेणीनिहाय संरक्षण : 0झेड प्लस : 25 कमांडोंचे कवच 0झेड : 11 सुरक्षारक्षक तैनातीत 0 वाय : 2 सशस्त्र सुरक्षारक्षक.