आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारच्या योजनांसाठी आधार कार्ड सक्ती नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सरकारी योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड अनिवार्य नाही. सार्वजनिक वितरण प्रणाली, घरगुती स्वयंपाकाचा गॅस व केरोसीन वितरण व्यवस्थेशिवाय इतर कोणत्याही कामासाठी या योजनेअंतर्गत जमा केलेल्या माहितीचा कुठेही वापर करता येणार नाही. गुन्ह्यांच्या तपासासाठी वापर करता येईल, पण तोही न्यायालयाच्या परवानगीनेच. न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या पीठाने मंगळवारी हा निकाल दिला.
कोर्टाने दोन मोठ्या प्रश्नांच्या समीक्षेसाठी विविध याचिका सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्याकडे पाठवल्या. घटनापीठाकडे त्या सुपूर्द केल्या जातील. ‘गोपनीयतेचा अधिकार घटनेतील मौलिक अधिकारात येतो की नाही आणि तो येत असेल तर त्याच्या मर्यादा काय,’ असे दोन प्रश्न घटनापीठाकडे पाठवले जातील. हा निकाल देणाऱ्या न्यायपीठात न्यायमूर्ती एस. ए. बोबडे व सी. नागप्पनही हाेते. आधार कार्ड योजनेला आव्हान देणारी अंतरिम याचिका मात्र न्यायपीठाने फेटाळली.
बातम्या आणखी आहेत...