आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Thinking Of Reducing Juvenile Age For Serious Offenses Like Rape And Murder

गंभीर गुन्‍ह्यांमध्‍ये अल्‍पवयीन आरोपींचे 'वय'कवच काढून घेण्‍याचा सरकारचा विचार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- हत्‍या आणि बलात्‍करांसारख्‍या गंभीर गुन्‍ह्यांमध्‍ये अल्‍पवयीन आरोपी केवळ वय कमी असल्‍यामुळे सुटून जातात. परंतु, सरकार आता अशा गुन्‍ह्यांसाठी बालगुन्‍हेगारांची वयोमर्यादा घटविण्‍याचा विचार केंद्र सरकार करत आहे. अशा प्रकरणात 16 ते 18 वयोगटातील गुन्‍हेगारांना प्रौढ गृहीत धरुन खटला चालविण्‍याचा विचार सरकारने केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

बालगुन्हेगारी कायद्याअंतर्गत बलात्कार, सामूहिक बलात्कार तसेच हत्या यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असतानाही, केवळ वय 18 वर्षाखालील असल्याने अनेक आरोपींना अतिशय कमी शिक्षा होते. परंतु, दिल्‍लीतल सामुहिक बलात्‍काराच्‍या खटल्‍यानंतर जनतेमध्‍ये प्रचंड रोष निर्माण झाला. त्‍यामुळे सरकार या कायद्यात काही बदल करण्‍याचा विचार करत आहे. अशा बालगुन्हेगारांनाही वयस्क गुन्हेगारांप्रमाणे गंभीर शिक्षेस पात्र ठरवण्यासाठी कायद्यात बदल करण्याच्या विचारात सरकार आहे.