आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government To Amend Child Labour Prohibition Act

१४ वर्षांपेक्षा कमी वयाची मुलेही करू शकतील काम, बालकामगार कायद्यात दुरुस्तीची तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकार बालकामगार कायद्यात दुरुस्ती करण्याची तयारी करत आहे. संसदेच्या याच अधिवेशनात बालकामगारविरोधी अधिनियमात प्रस्तावित दुरुस्त्या विधेयक मंजूर करवून घेण्याची सरकारची तयारी सुरू आहे. त्यातील तरतुदीनुसार, १४ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना कौटुंबिक व्यवसायात काम करण्याची परवानगी दिली जाईल. मात्र, यामुळे त्यांच्या शिक्षणावर कोणताही परिणाम न होऊ देण्याची अटही ठेवली जाईल.

कायद्यातील प्रस्तावित मसुद्यानुसार, मुले शाळेतून परतल्यानंतर, व सुट्यांदरम्यान किंवा तंत्रशिक्षण संस्थेतून परतल्यानंतर आपल्या कुटुंबाच्या शेती, बागा वा घरात होणाऱ्या एखाद्या कामात मदत केल्यास ते कायद्याचे उल्लंघन समजले जाणार नाही. नवीन नियम मनोरंजन उद्योग आणि क्रीडा क्षेत्रावरही (सर्कस वगळून) लागू असेल. मात्र, १४ ते १८ वर्षांपर्यंत वय असलेल्या मुलांना धोकादायक उद्योगांत काम करण्याची कदापि परवानगी दिली जाणार नाही.
कामगार मंत्रालयातील सूत्रांनुसार, कौटुंबिक व्यवसाय सोडून मोठ्या वा इतर छोट्या संघटनांत बालकामगारविरोधी सध्याच्या सर्व तरतुदी लागू असतील. लवकरच याबाबतचे विधेयक संसदेत सादर केले जाणार आहे. भारतात अनेक गरिब कुटुंबांत चरितार्थ भागवण्यासाठी मुले मदत करतात. अशाच कुटुंबांसाठी ही तरतूद ठेवण्यात आल्याचे सूत्राने सांगितले.

यूपीए सरकारचाच प्रस्ताव : विशेष म्हणजे, मूळ बालकामगार विरोधी कायद्यात फक्त १८ धोकायदायक उद्योगांत १४ वर्षांखाली मुलांना काम करण्यावर बंदी होती. मात्र, यूपीए सरकारने २०१२ मध्ये सर्व उद्योगांना या कायद्याच्या कक्षेत आणण्याचा प्रस्ताव ठेवला होता.