नवी दिल्ली - सरकार जनधन योजनेशी संबंधित गरिबांना आता आरोग्य योजनेचा लाभ देण्याच्या दिशेने काम करत आहे. एक लाख रुपयांच्या अपघात विमा सुरक्षेशिवाय जनधन खाते पेन्शन योजनांशीही जोडले जाईल, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी सांगितले. पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत आतापर्यंत १४ कोटी बँक खाती उघडली आहेत. त्यात १४ हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा आहे. जेटली म्हणाले, आता देशातील गरिबांनाही बँक व्यवहार करता येईल.