आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकारी विद्यापीठे, कॉलेजची फी वाढ; येत्या सत्रापासून अमलबजावणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आगामी २०१७-१८ शैक्षणिक वर्षापासून देशभरातील सरकारी विद्यापीठे व महाविद्यालयांचे शुल्क वाढवण्याची तयारी सुरू आहे. विद्यापीठांमध्ये पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पीय तरतूद वाढवण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे.
१२ वी पर्यंत सरकारी शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी उच्च शिक्षण संस्थांत शुल्कात सूटही मिळेल. मनुष्यबळ विकास मंत्रालयातील अधिकारी म्हणाला, सध्या दिल्ली विद्यापीठाच्या काॅलेजचे शुल्क खासगी शाळांच्या नर्सरीपेक्षा कमी आहे. उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी पायाभूत सुविधांकरिता शुल्क वाढ केली जाईल. सरकार येत्या सत्रापासून सरकारी विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्थांना जागतिक संस्था घोषित करणार आहे.
बातम्या आणखी आहेत...