आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम धर्मगुरु झाकीर नाईकचे 26/11चा मास्टरमाइंड हाफिजशी कनेक्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ मुंबई -सरकारने मुस्लिम धर्मोपदेशक डॉ. झाकीर नाईकभोवती फास आवळण्यास सुरुवात केली आहे. झाकिर व मुंबईवरील 26/11 या सगळ्यात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा मास्तरमाइंड हाफिज सईदचे कनेक्शन असल्याचे संशय इंटेलिजन्स ब्युरोने (आयबी) व्यक्त केला आहे. 'जमात-उल- दावा'च्या उर्दू वेबसाइटवर झाकिर यांच्या 'इस्लामिक रिसर्च फाउंडेशन'च्या वेबसाइटची लिंक आहे. दरम्यान 26/11 हल्ल्यानंतर 'जमात'ने आपल्या वेबसाइटचे नाव व अॅड्रेस बदलला होता.

दुसरीकडे, बांगलादेशची राजधानी ढाक्यातील एका हॉटेलवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांपैकी दोघे अतिरेकी डॉ. नाईकच्या द्वेषमूलक भाषणामुळे प्रेरित झाल्याचे समोर आल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. डॉ. नाईकच्या कथित आक्षेपार्ह भाषणांची चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांना दिले आहेत.

केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू आणि केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी गुरूवारी डॉ. नाईकची भाषणे ‘अत्यंत आक्षेपार्ह’ असल्याचे गुरुवारी सांगितले. सरकार त्याच्याविरुद्ध कारवाई करू शकते. हे कायदेशीर प्रकरण आहे, असे ते म्हणाले. ढाक्यात मारल्या गेलेल्या अतिरेक्यांवर नाईकच्या भाषणांचा प्रभाव होता. एका अतिरेक्याने तर आपल्या फेसबुक वॉलवर नाईकचा संदेशही पोस्ट केला होता. त्यात डॉ.नाईकने सर्व मुस्लिमांना अतिरेकी बनण्याचा आग्रह केला होता. नाईकच्या भाषणांची चौकशी करावी, असा आग्रह बांगलादेशने भारताकडे धरला होता.

पुढील स्लाइडवर वाचा, दिग्विजय सिंहांनी झाकीर नाईकला म्हटले होते शांतिदूत'

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...