आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडिया मोबाइल काँग्रेस 2017; सरकारचे ‘संकटकालीन मोबाइल नेटवर्क’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- इंडिया मोबाइल काँग्रेसच्या दुसऱ्या दिवशी बीएसएनएल आणि दूरसंचार उपकरण उत्पादक विहानमध्ये संकटकाळी मोबाइल नेटवर्कसंबंधी करार झाला. संकटाच्या काळात ही सेवा तासाभरात सुरू केली जाऊ शकते. सायबर हल्ल्यावर झालेल्या परिसंवादात सायबर सुरक्षेविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. सायबर हल्ल्यांचे प्रमाण पाहता सुरक्षेचा आवाका वाढवण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले आहे.  

काँग्रेसमध्ये गुरुवारी सायबर हल्ल्यावर परिसंवाद झाला. यात रिलायन्स इंडस्ट्रीज तसेच डेलॉय इंडियासारख्या कंपन्यांच्या तज्ज्ञांनी सहभाग घेतला. काँग्रेसचे संयोजक सीओएआयचे डीजी राजन मॅथ्यू म्हणाले की, “सायबर सुरक्षासारखे विषय संवेदनशील असतात. त्यामुळे त्याच्याशी संबंधित माहिती आम्ही सार्वजनिक करू शकत नाही. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सायबर सुरक्षातज्ज्ञ रघुरमण यांच्या मते, पुरेशी साधने असतानाही आपण सायबर हल्ल्याचे संकट पूर्णपणे संपवू शकत नाही. दररोज अनेक प्रकारचे हॅकिंग होते. कोणती हॅकिंग किती भयानक आहे याचा अंदाज लावता येत नाही. याबाबत आपल्याला आवाका वाढवावा लागणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...