आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Govindacharya Complains To EC Against BJP E Paper Advertisements

गोविंदाचार्यांनी उघडला भाजप विरोधात मोर्चा, निवडणूक आयोगाकडे तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजपच्या इ-पेपरवरील जाहिरातीवर आक्षेप घेत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी (आरएसएस) संबंधीत राजकीय विश्लेषक के.एन.गोविंदाचार्य यांनी निवडणूक आयोगाकडे दिल्ली निवडणूक रद्द करण्याची आणि भारतीय जनता पक्षाविरोधात (भाजप) कारवाईची मागणी केली आहे. गोविंदाचार्यांचा आरोप आहे, की भाजपने इंटरनेटवर एक अशी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, ज्यामुळे प्रतिनिधीत्व कायद्याचे उल्लंघन झाले आहे.
गोविंदाचार्यांचे वकील विराग गुप्ता यांनी सांगितले, की भाजपने सर्व इ-पेपरला जाहिराती दिल्या आहेत. गोविंदाचार्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे, की मतदानाच्या 48 तास आधी राजकीय पक्षांना इ-पेपरमध्ये जाहिरात प्रसिद्ध करता येत नाही. तसे केले तर आरपीए अॅक्ट सेक्शन 126 चे ते उल्लंघन आहे. निवडणूक आयोगाने यासंबंधी 23 ऑक्टोबर 2013 रोजी स्पष्ट निर्देश आणि मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या.

विराग गुप्ता म्हणाले, निवडणूक आयोगाने या तक्रारीचा गांभीर्याने विचार केला नाही तर आम्ही न्यायालयाकडे दाद मागू. दिल्ली विधानसभेसाठी आज (शनिवार) मतदान होत आहे. भाजपने शनिवार आणि शुक्रवार असे दोन दिवस अनेक वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर जाहीरात दिली आहे. या वृत्तपत्रांच्या इ-पेपरवरही ही जाहीरात स्पष्ट पाहायला मिळते.


दुसरीकडे, आज दिल्ली विधानसभेसाठी मतदान होत आहे. भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी, आपचे संयोजक आणि नवी दिल्लीतून निवडणूक लढत असलेले अरविंद केजरीवाल, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, काँग्रेसचे सदर बाजार मतदारसंघातील उमेदवार अजय माकन, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या आणि ग्रेटर कैलाश येथील काँग्रेस उमेदवार शर्मिष्ठा मुखर्जी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी मतदान केले.

फोटो - भाजपची जाहिरात

पुढील स्लाइडमध्ये पाहा, दिल्लीतील कोणकोणत्या दिग्गजांनी केले मतदान