आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूसंपादनावर भाजपने कधी आश्वासन दिले?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भूसंपादन विधेयकावरून पक्षांतर्गत मतभेदास भाजपला सामाेरे जावे लागत आहे. या विधेयकाबाबत स्थापन संसदेच्या संयुक्त समितीपुढे भाजपचे माजी नेते गोविंदाचार्य यांनी भूसंपादनाबाबत भाजपने काेणाला व कधी आश्वासन दिले हाेते? असा प्रश्न करून अडचणीत आणले आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनीही या विधेयकाबाबत समितीपुढे अण्णांची बाजू मांडली. या विधेयकाबाबत संसदेची संयुक्त समिती देशातील विविध लाेकांशी संपर्क साधून त्यांची मते जाणून घेत आहे.

गाेविंदाचार्य म्हणाले की, भूसंपादन विधेयकात दुरुस्ती का केली जात आहे? त्याची कारणे देशवासीयांपुढे स्पष्ट केली जावीत. काेणत्या आधारावर भाजप सरकार या विधेयकात बदल करण्यास आतुर आहे? असे काेणते संकट आले आहे की सरकारला तातडीने पावले उचलणे अत्यावश्यक वाटते आहे? लाेकसभा निवडणुकीच्या वेळी या विधेयकात बदल करण्याचे आश्वासन भाजपने दिले नव्हते.

स्मार्ट व्हिलेजचे काय?
अण्णा हजारे यांच्या माध्यमातून पाटील यांनी सरकारला स्मार्ट सिटीवरून धारेवर धरले. देशभरात १०० स्मार्ट शहरे केली जाणार आहेत, परंतु स्मार्ट गावांबद्दल माेदी सरकारची काय भूमिका आहे? ग्रामीण क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा मूळ गाभा आहे, शहरांना स्मार्ट करताना खेड्यांची उपेक्षा करणे याेग्य नसल्याचे मत पाटील यांनी समितीपुढे मांडले.
बातम्या आणखी आहेत...