आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकभावना पाहून राजीनामा द्या, अन्यथा बोफोर्स होईल; गोविंदाचार्यांचे परखड मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ललित मोदी प्रकरणात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे दोषी असल्याची भावना सामान्यांत आहे. त्यामुळे त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, असे परखड मत रा.स्व. संघाचे विचारक गोविंदाचार्य यांनी व्यक्त केले.

एका प्रश्नावर गोविंदाचार्य म्हणाले, या दोघींनी लालकृष्ण अडवाणी, लालबहादूर शास्त्री, शरद यादव यांंचा कित्ता गिरवावा. अशी अनेक उदाहरणे आहेत. त्याचा पक्षाला फायदाच झालेला आहे. स्वराज व राजेंनी ललित यांना मदत केल्याचे सकृतदर्शनी दिसते. नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला आणि तपासात निर्दाेष आढळल्यास परतीचा मार्ग आहेच. कायदेशीर मार्गांनी लढा देण्याचा विचार केल्यास बोफोर्सचे झाले तसे प्रकरण लांबत राहील, असे गोविंदाचार्य एका मुलाखतीत म्हणाले.

मोदी मौन शिकताहेत
नैतिक मूल्यांना प्राधान्याची घोषणा केल्यावर मिळालेला जनादेश मोदी गमावत असल्याबाबत गोविंदाचार्य म्हणाले, मोदीही मौन राहणे शिकत आहेत. घोटाळयात नावे समोर येत असलेल्या मंत्री व नेत्यांना वाचवणे मोदींना महागात पडेल. पंतप्रधानांत राजकीय चातुर्य आहे. त्यांच्या मनात काहीतरी विचार सुरू असेलच, असे मला वाटते.
आरोप होताच राजीनामा दिला होता : अडवाणी
भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी स्वराज व राजेंना राजीनाम्याचा संदिग्ध सल्ला दिला. हवालाकांडात नाव अाले त्याच दिवशी तुम्ही राजीनामा दिला, त्याची रुखरुख वाटते का, असे विचारले तेव्हा अडवाणी म्हणाले, हवालाकांडाचे आरोप झाल्यानंतर मी तत्काळ राजीनामा दिला होता. त्याचे वैषम्य वाटत नाही. दोन वर्षे निवडणूक लढवता आली नाही, याचेही दु:ख नाही. हा निर्णय सर्वस्वी माझा होता. राजकीय सचोटी असणे गरजेचे आहे.
बातम्या आणखी आहेत...