आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#lalitgate: नरेंद्र मोदी गप्प राहाणे शिकत आहेत, गोविंदाचार्य यांची टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भाजपचे माजी महासचिव आणि ज्येष्ठ राजकीय विचारवंत के.एन.गोविंदाचार्य यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. भाजपने नैतिकतेकडे पाठ फिरवली असून नरेंद्र मोदी आता गप्प राहाणे शिकत असल्याचे गोविंदाचार्य यांनी म्हटले आहे. 'ललित मोदी कांडात' अडकलेल्या भाजपच्या मंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यायला हवा, असे गोविंदाचार्य यांनी म्हटले आहे.

गोविंदाचार्य एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते. गोविंदाचार्य म्हणाले, समाज नैतिकतेच्या आधारावर चालतो, याचे भान भाजपच्या नेत्यांनी ठेवायला हवे. सरकार डावपेच करून मंत्र्यांची पाठराखण करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याप्रकरणी कमालीचे मौन धारण केले. आहे. कदाचित ती गप्प राहाणे शिकत असल्याचा टोला देखील गोविंदाचार्य यांनी लगावला.
ललित मोदी यांना मदत केल्याप्रकरणात अडकलेल्या मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारुन आपल्या पदाचा राजीनाम द्यायला हवा. मंत्र्यांकडून राजीनामा घेण्याची वेळ पंतप्रधानांवर यायला नको, असे गोविंदाचार्य यांनी म्हटले आहे. 'लाल बहादुर शास्त्री जेव्हा देशाचे रेल्वेमंत्री होते तेव्हा त्यांनी नैतिकेच्या आधारावर राजीनामा दिला होता, असे उदाहरण देखील गोविंदाचार्य यांनी यावेळी दिले.