आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Govindacharya Says Narendra Modi Is Responsible For Gujrat Riots

गुजरात दंगलींना नरेंद्र मोदीच जबाबदार, गोविंदाचार्यांचे टीकास्त्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुजरात दंगलीच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून दररोजच टीकेचे लक्ष्य होत असलेल्या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर एकेकाळी भाजपचे थिंक टँक म्हणून ओळखले जाणारे हिंदुत्ववादी नेते गोविंदाचार्य यांनी टीकास्त्र सोडले. गुजरात दंगलींची नैतिक जबाबदारी मोदी यांचीच असून त्यांनी ती घ्यायला हवी, असे स्पष्ट मत गोविंदाचार्य यांनी व्यक्त केले आहे.

एका खासगी नभोवाणीला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाचार्य म्हणाले की, निवडणुकीतील विजय एखाद्या व्यक्तीला बरोबर किंवा चुकीचा ठरवू शकत नाही. तो योग्यायोग्यतेचा निकष असू शकत नाही. तसे ठरवायचेच झाले तर चारा घोटाळ्यासाठी लालूप्रसाद यादव यांना दोष देणे चुकीचे आहे. कारण या घोटाळ्यानंतरही बिहारच्या निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवला होता, असे गोविंदाचार्य म्हणाले.