आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Govt. Failed To Follow Procurement Procedures In Agusta Westland Choppers

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑगस्टा सौद्यात गफलाच, कॅगचा अहवाल राज्यसभेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर ऑगस्टा वेस्टलँडच्या व्यवहारात दलाली घेतली गेल्याचा आरोप होत असताना आता भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षकांच्या (कॅग) अहवालातही या व्यवहारात गैरप्रकार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयाने सरकारी खरेदीच्या नियमांत मनमानी करून बदल केले आणि स्वस्त हेलिकॉप्टरची किंमत वाढवून हा सौदा केल्याचे अहवालात म्हटले आहे. यामुळे देशाच्या तिजोरीला फटका बसल्याचेही कॅगचे म्हणणे आहे.

मंगळवारी हा अहवाल राज्यसभेत सादर करण्यात आला. संरक्षण मंत्रालयाने 2010 मध्ये 3 हजार 727 कोटी रुपयांत 12 व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी करार केला. इटलीची कंपनी फिनमॅकेनिकाने हे हेलिकॉप्टर पुरवायचे होते. दरम्यान, या वर्षाच्या प्रारंभी कंपनीवर या करारासाठी 350 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप झाला होता.

कॅगच्या अहवालात नवा पैलू उघडकीस येण्यापूर्वीच या व्यवहारावरून देशात राजकीय वातावरण तापले होते. कॅगने या गैरव्यवहाराबद्दल संरक्षण मंत्रालय तसेच हवाई दलावर ताशेरे ओढले आहेत. दरम्यान, संरक्षण मंत्रालयाला सीबीआय चौकशीच्या अहवालाची प्रतीक्षा असून अहवाल आल्यानंतरच त्यांना या व्यवहाराबाबत अंतिम निर्णय घ्यावयाचा आहे.