आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Govt Allows PF Withdrawal For Housing, Medical Expenses

PF: नव्‍या नियमांविरोधात बंगळुरूत जाळपोळ, जाणून घ्या काय आहेत नियम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - कामगार संघटनांच्या तीव्र विरोधापुढे नमते घेत केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचे वय ५८ वर्षे होईपर्यंत भविष्य निर्वाह निधीतून (ईपीएफ) नियोक्त्यांच्या योगदानाची रक्कम काढण्यावर बंदी घालण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी तीन महिने स्थगित केली आहे.
अधिसूचना (ईपीएफ काढण्याचे नियम कडक करणारी) ३१ जुलै २०१६ पर्यंत तीन महिन्यांसाठी स्थगित ठेवण्यात येत आहे. दरम्यान, पीएफ निर्बंधांच्या निषेधार्थ बंगळुरूमधील कापड उद्योगातील कामगारांनी सुरू केलेल्या आंदोलनाला मंगळवारी हिंसक वळण लागले. कामगारांनी बसेस जाळल्या आणि पोलिस ठाण्यावर हल्ला चढवला. पीएफच्या रकमेतून नियोक्त्याच्या योगदानाची रक्कम काढण्यावर केंद्र सरकारने घातलेल्या बंदीच्या निषेधार्थ कामगार संघटनांची देशभर आंदोलने सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर दत्तात्रय यांनी ही घोषणा केली आहे. केंद्राच्या या निर्णयाविरुद्ध ऑनलाइन मोहीमही चालवण्यात आली. आधी हा निर्णय १० फेब्रुवारीपासूनच लागू केला जाणार होता. परंतु विरोधामुळे ३० एप्रिलपर्यंत अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली होती. ईपीएफ कायद्यातील दुरुस्तीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कापड कारखाना कामगारांवर सोमवारी पोलिसांनी लाठीमार केला होता. कामगार संघटना हा निर्णय पूर्णत: मागे घेण्याची मागणी करत आहेत.

ईपीएफमधील नियोक्त्यांचे योगदानाचा (मूळ वेतनाच्या ३.६७ टक्के) कर्मचाऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीने कसा उपयोग करता येईल, यावर विचार करण्यासाठी ईपीएफओच्या विश्वस्त मंडळाची बैठक बोलावण्यात येईल, असे दत्तात्रय म्हणाले.

ईपीएफओकडे जमा असलेली पूर्ण रक्कम घर खरेदी, गंभीर आजार, विवाह आणि मुलांचे व्यावसायिक शिक्षण अशा कार्यांसाठी काढण्याची अनुमती देण्याचा कामगार मंत्रालय विचार करत आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी कायदा मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. शिवाय अंशदानधारक केंद्र किंवा राज्य सरकारचा कर्मचारी आणि योगदानाच्या पीएफ योजनेत येत असेल तर त्यांना पीएफची पूर्ण रक्कम काढण्याची परवानगी असेल.

विशेष म्हणजे फेब्रुवारीत अधिसूचना जारी करून कामगार मंत्रालयाने अंशधारक दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ बेरोजगार राहिल्यास पीएफची शंभर टक्के रक्कम काढण्यावर बंदी घातली होती. कामगार संघटना व संबंधितांनी व्यक्त केलेली चिंता लक्षात घेऊन ही अधिसूचना ३० एप्रिलपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आता तो ३१ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे, असे कामगार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. या निर्णयामुळे ईपीएफओ अंशदानधारक दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ बेरोजगार राहिल्यास ते जुलैपर्यंत भविष्य निर्वाह निधीची पूर्ण रक्कम काढण्यासाठी आवेदन करू शकतील. आता १ ऑगस्ट २०१६ पासून अधिसूचना अमलात येईल. त्यासाठी सुधारित अधिसूचना काढण्यात येईल, असे या निवेदनात म्हटले आहे.
काय मिळेल फायदा, कुठे झाला विरोध, नेमके काय म्‍हणाले सरकार....
- पीएफ अकाउंटमधून पैसे काढण्‍यासंदर्भातील नियमांमध्‍ये शासनाकडून बदल केले जात आहेत.
- गंभीर आजार, मुलांचे शिक्षण, लग्‍न व हाउसिंग यासाठीच पीएफचे पूर्ण पैसे काढता येतील.
- अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्‍ताव कायदा मंत्रालयाकडे पाठवण्‍यात आला आहे.
येथे झाला विरोध....
- पीएफ काढण्‍याच्‍या या नवीन नियमांना काहींनी विरोध करत बंगळुरूमध्‍ये आंदोलन केले आहे.
- गारमेंट्स इंडस्ट्री आणि शासकीय कर्मचा-यांनी काही परिसरात तोडफोड केली.
- आंदोलकांनी 15 हून अधिक बस पेटवल्‍याची माहिती आहे.
- नवीन नियमांविरोधात सोमवारपासून आंदोलन होत आहे.
- तीन तासांसाठी आंदोलकांनी म्‍हैसूर-बंगळुरु महामार्ग बंद केला होता. त्‍यामुळे वाहतूकीची चांगलीच कोंडी झाली.
- विरोधकांनी एका पोलिस अधिका-याला घेरले. अधिका-याला त्‍याचा जीव वाचवण्‍यासाठी हवेत गोळीबार करावा लागला.
- आंदोलकांनी होसूर रोडवरील पोलिस स्‍टेशनमध्‍ये एका वाहनाला पेटवले.
- याप्रकरणी 20 जणांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे.
- कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर म्‍हणाले, लोकांनी विरोध करू नये , पोलिस संयमाने प्रकरण हाताळत आहेत.
- याआधी सोमवारीही गारमेंट इंडस्ट्री्च्‍या कामगारांनी आंदोलन केले होते.
का होत आहे विरोध....
- पीएफसंदर्भातील एक नियम बदलल्‍याने बंगळुरूत आंदोलन पेटले.
- आपण 60 दिवसांपासून बेरोजगार असाल तर आपल्‍या ईपीएफचे 100% कॉन्ट्रिब्यूशन विदड्रॉ करू शकतो.
- 10 फेबुवारीला निर्णय घेण्‍यात आला की, 1 मे 2016 पासून पीएफचे पूर्ण पैसे काढता येणार नाहीत.
- त्‍यासाठी आपल्‍या 58 वर्ष पूर्ण होण्‍याची वाट पाहावी लागेल.
- या नियमावर कर्मचारी भडकले अन् त्‍यांनी आंदोलनाला सुरूवात केली.
- मात्र आता तीन महिन्‍यांसाठी शासनाने या नियमावर अंमलबजावणी करणे टाळले आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, पीएफच्‍या या चार नियमांमध्‍ये काय बदल होतील....
पाहा, आंदोलनाने धारण केलेले तीव्र स्वरुप....