आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Govt Conveyed Concerns At Attempt To Infiltrate Armed Terrorists From Across LoC

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PAK कडून 6 दिवसांमध्ये 27 वेळा अगळीक, सरकार म्हणाले- गोळी आणि चर्चा एकत्र नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विक्सा स्वरुप म्हणाले, चर्चेसाठी शांतता पाहिजे. - Divya Marathi
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विक्सा स्वरुप म्हणाले, चर्चेसाठी शांतता पाहिजे.
नवी दिल्ली - परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप म्हणाले, की पाकिस्तानने ६ दिवसांमध्ये २७ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आणि १५ वेळा दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. या स्थितीत चर्चा होऊ शकत नाही. त्यासाठी शांतता गरजेची आहे. स्वरुप म्हणाले, की चर्चा आणि दहशतवाद एकाचवेळी चालू शकत नाही. भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर आतापर्यंत LoC, जम्मू-काश्मीर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाककडून ३०० वेळा फायरिंग झाली आहे. यात २६ जण मृत्यूमुखी पडले त्यात १४ जवान शहीद झाले.
पाकिस्तानने दहशतवाद्यांना सहकार्य करणे बंद करावे
- विकास स्वरुप म्हणाले, सीमेपलिकडून होणाऱ्या घुसखोरीने सरकार त्रस्त आहे.
- पाकिस्तानडून LoC वरील गावांना लक्ष्य करण्याचा भारत सरकारने तीव्र विरोध केला आहे. पाकिस्तान जाणून बुजून असे करीत असल्याचे स्वरुप म्हणाले.
- सात आठवड्यांपूर्वी चुकीने LoC पार करुन गेलेल चंदू बाबूलाल छवन यांच्या सुरक्षित वापसीसाठी भारत सरकार प्रयत्न करीत आहे.
- पाकिस्तानकडून सुरु असलेल्या या कुरापतींसाठी या महिन्यात चार वेळा त्यांच्या उप उच्चायुक्तांना हजर राहाण्यास सांगण्यात आले होते.
बातम्या आणखी आहेत...