आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाभरातच 1 लाख बनावट कंपन्या बंद; ब्लॅकमनीवर मोदी सरकारच्या कारवाईचा दणका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - शेल कंपन्या (बनावट) कंपन्या स्थापित करून काळा पैसा जमा करणाऱ्यांविरोधात मोदी सरकारने मोहिम छेडली आहे. ब्लॅक मनीविरुद्धा सरकारच्या या कारवाईमुळे अवघ्या एका महिन्यात अशा तब्बल 1 लाख कंपन्या बंद पडल्या आहेत. कंपनी व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 10 वर्षांच्या इतिहासात ही शेल कंपन्यांविरुद्धची सर्वात मोठी कारवाई आहे. अशाच प्रकारचे गैरव्यवहार करणाऱ्या इतर कंपन्यांवर सुद्धा सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे. 
 
- काळा पैसा जमा करण्यासाठी आणि कर चुकवण्यासाठी ज्या कंपन्या स्थापित केल्या जातात अशा कंपन्यांना शेल कंपन्या संबोधले जाते.
- मोदी सरकार गेल्या काही महिन्यांपासून अशाच संशयित कंपन्यांना लक्ष्य करत आहे. सरकारची कठोर कारवाई पाहता अनेक कंपन्यांचे मालक स्वतः ह्या कंपन्या बंद करण्यासाठी धावपळ करत आहेत.
- मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एका महिन्यात 1 लाख 3 हजार पेक्षा अधिक शेल कंपन्या बंद झाल्या असून हा एक विक्रम आहे. यापूर्वी एका महिन्यात सरासरी 3 ते 4 हजार शेल कंपन्या बंद होत असत.
- रेजिस्टर ऑफिस ऑफ कंपनीजने सक्ती केल्याचा हा परिणाम आहे. मोदी सरकार संशयित कंपन्यांना लक्ष्य करत आहे. याच अंतर्गत सरकार आणखी काही कंपन्यांवर सुद्धा बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या विरुद्ध पुरावे सापडल्यास त्या सुद्धा बंद केल्या जातील. 
बातम्या आणखी आहेत...