आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी कर्जमाफीची कोणतीच योजना नाही : अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा कोणत्याच प्रकारचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याची माहिती अर्थ राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली. मात्र, जे शेतकरी कर्जाची नियमित परतफेड करतात त्यांच्यावरील कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी सरकारच्या अनेक योजना असल्याचे त्यांनी सांगितले. 

एका प्रश्नाचे लेखी उत्तर देत अर्थ राज्यमंत्र्यांनी सांगितले की, कृषी, सहकार तसेच शेतकरी कल्याण विभागांतर्गत शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे कर्ज ७ टक्के व्याजदराने दिले जात आहे. या योजनेत जे शेतकरी वेळेवर भरणा करतात त्यांना व्याजात अतिरिक्त ३ टक्क्यांची सवलत देण्यात येत आहे. यामुळे वार्षिक व्याजदर चार टक्क्यांवर येतो.  त्याचबरोबर कर्ज देणाऱ्या सर्व संस्थांना नैसर्गिक आपत्तीच्या काळात उपाय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बातम्या आणखी आहेत...