आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Govt Issues Notice To Kejriwal, Asks For Rs 85000 Per Month Rent

केजरीवालांना थकित 85 हजार भाडे भरण्याचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या महिनाभरानंतरही कोट्यातील फ्लॅट सोडण्याचे नैतिक भान दाखवले नाही. त्यामुळे दिल्ली सरकारने त्यांना नोटीस बजावली आहे. राजीनाम्यानंतर अधिकार नसतानाही मुक्काम ठोकून असलेल्या केजरीवाल यांनी भाड्यापोटी तत्काळ 85 हजार रुपये अदा करावेत, असे आदेश सरकारने दिले आहेत.

केजरीवाल यांनी राजीनाम्यानंतर घराचा ताबा सरकारकडे परत केला नाही. उलट घराचा ताबा विलंबाने देण्यासंदर्भात अर्ज करून मुक्काम ठोकला. मे महिन्यात मुलीची परीक्षा आहे. ही परीक्षा होईपर्यंत आपण घर सोडू शकणार नाही, अशी सबब त्यांनी दिली आहे.