आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय ग्राहकांच्या डाटा सुरक्षेसाठी मोबाइल कंपन्यांनी काय केले, केंद्राचा मोबाइल कंपन्यांना सवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरकारने 21 कंपन्याना नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे यापैकी बहुतेक चीनी कंपन्या आहे. - Divya Marathi
सरकारने 21 कंपन्याना नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे यापैकी बहुतेक चीनी कंपन्या आहे.
नवी दिल्ली - भारतातील स्मार्टफोन कंपन्यांना ग्राहकांची प्रायव्हसी आणि डाटा सुरक्षेसाठी काय उपाय योजना केली आहे, असा सवाल केंद्र सरकारने विचारला आहे. भारतीय स्मार्टफोनच्या बाजारपेठेत मोठा हिस्सा हा चिनी कंपन्यांचा आहे. त्यावर केंद्र सरकारची नजर आहे. भारत आणि चीन दरम्यान सिक्कीममधील डोकलामवरुन वाद सुरु आहे, अशावेळी केंद्र सरकारने घेतलेली ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.  
 
काय आहे प्रकरण 
- केंद्र सरकारने एक नोटीस जारी करुन स्मार्टफोन कंपन्यांना विचारले आहे, की ग्राहकांची प्रायव्हसी आणि डाटा सुरक्षेसाठी कोणत्या उपाय योजना केल्या आहेत? तुम्ही केलेल्या उपाय योजना या दोन्ही बाबतीत सुरक्षा देतात का? 
- भारतीय बाजारपेठेत चीनचे आयटी आणि टेलिकॉम उत्पादने मोठ्या प्रमाणात आहेत. चीनेच्या अनेक बड्या कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत घट्ट पाय रोवले आहेत. 
 
28 ऑगस्ट पर्यंत मागितले उत्तर 
- माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयातील एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने वृत्त संस्थेने म्हटले आहे, की स्मार्टफोन निर्मिती कंपन्यांना 28 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. 
- या अधिकाऱ्याने सांगितले, की आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गतही अनेक ठिकाणी डाटा लीकची प्रकरणे समोर आली आहे. त्यामुळे सरकारने भारतीय ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी कंपन्यांनी काय उपाय योजना केल्या आहेत याची माहिती मागवली आहे. 
- पहिल्या टप्प्यात डिव्हाइस, सॉफ्टवेअर आणि अॅप्स अशी वर्गवारी करण्याची मंत्रालयाने तयारी केली आहे. 
 
काय करणार सरकार 
- सरकार सध्या कंपन्यांकडून उत्तराची वाट पाहात आहे. त्यानंतर मंत्रालय याची पडताळणी करुन डिव्हाइस ऑडिट करण्याची शक्यता आहे. 
- यात जर काही बेकायदेशीर सापडले तर IT Act 43 (A) नुसार आधी वॉर्निंग दिली जाईल त्यानंतर दंड आकारण्याची तरतूद आहे. 
- अधिकाऱ्याने स्पष्ट केले की,  सरकारचा उद्देश स्पष्ट आहे की कंपन्यांनी मोबाइल हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर द्वारे सुरक्षेची योग्य काळजी घेतली आहे की नाही हे तपासणे आहे. 
 
कोणत्या कंपन्यांवर आहे सरकारची नजर 
- सुरुवातीला सरकारने 21 कंपन्याना नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे यापैकी बहुतेक चीनी कंपन्या आहे. यांची भारतात वेगाने वाढ होत आहे. 
- अधिकाऱ्याने वॉर्निंग देत सांगितले, की या देशात विक्री केल्या जाणाऱ्या प्रत्येक डिव्हाइसमध्ये जागतिक सुरक्षा मानकांचा वापर झाला आहे की नाही याची पडताळणी होणार आहे. असे न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. 
- माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नुकतीच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यानंतर यासंबंधीत वेगाने घडामोडी घडल्या आहेत. 
बातम्या आणखी आहेत...