आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Govt Likely To Ban Onion Exports To Check Prices

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निर्यात थांबली नाही तर कांदा 100 रुपयांवर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई /नवी दिल्ली - कांद्याने सध्या देशभरातील ग्राहकांच्या डोळ्यात खरोखर पाणी आणले आहे. ईदला 45 ते 60 रुपये किलो विकल्या गेलेल्या कांद्याची निर्यात बंद केली नाही तर लवकरच तो 100 रुपये किलोवर जाण्याची शक्यता आहे.

आशियात कांद्याची सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावात (जि. नाशिक) कांदा 31.50 रुपये किलोवर गेला आहे. 31 जुलैला हा भाव 24 रुपये होता. काही ठिकाणी तर 50 ते 60 रुपये किलोने कांदा विकला जात आहे. यावर निर्यातबंदीचा रामबाण उपाय असला तरी कृषिमंत्री शरद पवार यांनी यामुळे समस्या सुटणार नाही, असे म्हटले आहे.

गेल्या वर्षी याच काळात कांदा भडकला होता. तेव्हा सरकारने तातडीने निर्यातबंदी केल्यानंतर कांद्याचे भाव लगेच 35 रुपयांवरून कमी होऊन 14-15 रुपयांवर आले होते.

कारणे काय?
महाराष्ट्रात पावसामुळे कांद्याचे प्रचंड नुकसान झाले. तमिळनाडूमध्येही हीच अवस्था आहे. यावर निर्यातबंदी करून कांद्याचा भाव नियंत्रणात ठेवता आला असता; परंतु केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.