आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळी अधिवेशनाआधी नव्या गव्हर्नरची घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नव्या गव्हर्नरच्या नावाची घोषणा पुढील महिन्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या आधी होण्याची शक्यता आहे. यादरम्यान रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर राकेश मोहन यांच्या नावाची संभावीत उमेदवार म्हणून चर्चा सुरू आहे. अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी िदलेल्या माहितीनुसार, गव्हर्नर रघुराम राजन यांच्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी कोणाची निवड केली जाणार या निर्णयाच्या जवळ प्रक्रिया पोहोचलेली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नवीन गव्हर्नरच्या नावाची घोषणा जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत होईल. राकेश मोहन सध्या वॉशिंग्टनमध्ये असलेल्या अांतरराष्ट्रीय मुद्राकोशमध्ये भारताचे कार्यकारी निदेशक म्हणून कार्यरत आहेत.
बातम्या आणखी आहेत...