आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेवढा कि.मी. प्रवास कराल, तेवढ्याच अंतराचा लागणार टोल; नव्या धोरणाची घोषणा लवकरच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑगस्‍टमध्‍ये सर्वप्रथम उत्‍तरप्रदेशमधील एका एक्‍सप्रेसवेवर नवीन टोल धोरणानूसार टोल वसूली केली जाणार आहे. - Divya Marathi
ऑगस्‍टमध्‍ये सर्वप्रथम उत्‍तरप्रदेशमधील एका एक्‍सप्रेसवेवर नवीन टोल धोरणानूसार टोल वसूली केली जाणार आहे.
नवी दिल्‍ली- केंद्र सरकार लवकरच लवकरच नव्‍या टोल धोरणाची घोषणा करणार आहे. यानूसार जेवढा कि.मी प्रवास केला, तेवढ्याच अंतराचा टोल द्यावा लागणार आहे. सध्‍या टोल नाक्‍यांवर फिक्‍स चार्ज आकारला जातो.
 
नितीन गडकरी यांची माहिती...
- रस्‍ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात याबद्दल माहिती दिली. 
- 'टोल टॅक्‍सविषयी सरकार लवकरच नवे धोरण जाहीर करणार आहे. याबद्दल सध्‍या काम सुरु आहे', असे त्‍यांनी सांगितले.  
- 'टोल टॅक्‍स प्रति किलोमीटरच्‍या हिशोबाने घेण्‍यात यावा, अशी सूचना आम्‍हाला आली होती. याबद्दल आम्‍ही गांभिर्याने विचार करत आहोत', असे गडकरी यांनी सांगितले. 
 
नवीन टोल धोरणामागील हेतू?      
- राष्‍ट्रीय महामार्गावर आकारण्‍यात येणाऱ्या टोलमूळे देशात अनेक ठिकाणी वाद होत आहेत. 
- ठिकठिकाणी स्‍थानिक ना‍गरिक टोलविरोधात आंदोलन करत आहेत. यामुळे टोल कर्मचारी आणि नागरिकांमध्‍ये वाद झाल्‍याच्‍याही घटना अनेक ठिकाणी घडल्‍या आहेत. याचा राजकीय दबावही नेत्‍यांवर आहे. 
- अशावेळी प्रति किलोमीटरच्‍या हिशोबाने टोल आकारला गेला तर स्‍थानिकांना खूप कमी टोल भरावा लागेल. यामुळे त्‍यांचा टोलविरोधही सौम्‍य होईल.
- तसेच जास्‍त अंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जास्‍त टोल टॅक्‍स भरावा लागणार असल्‍यामुळे टोल कंपन्‍यांचेही नूकसान होणार नाही. 
 
सध्या असा आकारला जातो टोल... 
- सध्‍या देशातील राष्‍ट्रीय महामार्गांवर प्रत्‍येक 60 कि.मीवर टोल नाका आहे, अशी माहिती रस्‍ते व वाहतूक मंत्रालयाच्‍या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 
- प्रत्‍येक 5 कि.मीसाठी सरासरी 5 रुपये टोल आकारला जातो अशी  माहिती त्‍यांनी दिली. 
- नवीन धोरणानुसार हे सर्व दर बदलणार आहेत. 

येथून होऊ शकते होऊ सुरुवात 
- ऑगस्‍टमध्‍ये उत्‍तर प्रदेशमधील ईस्‍टर्न पेरिफिरल एक्‍सप्रेस-वेवर नवीन धोरणानूसार टोल वसूली केली जाऊ शकते, असे मंत्रालयाच्‍या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 
- हा एक्‍सप्रेस-वे पलवल, गाझियाबाद आणि कुंडली यांना जोडणारा असून त्‍याची लांबी 135 किमी असणार आहे.    
बातम्या आणखी आहेत...