आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Govt Moves Proposal For FDI In Railways, May Gift Shigh Speed Trains

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

9 जुलैला रेल्वे अर्थसंकल्प? ताशी 200 किमी वेगाची रेल्वे आणि एफडीआय राहाणार मुख्य मुद्दे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकार 9 जुलैला रेल्वे अर्थसंकल्प आणि 11 जुलैला अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे. यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात ताशी 200 किलोमीटर वेगाने धावणा-या रेल्वेची जनतेला भेट मिळण्याची शक्यता आहे. तसेच रेल्वेमध्ये एफडीआय आणण्याचाही प्रस्ताव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशना्च्या तारीखे बाबतची चर्चा झाली. सुत्रांची माहिती आहे, की अधिवेशन 7 जुलैपासून सुरु होईल. अधिवेशनामुळे पंतप्रधान मोदींनी जुलैच्या पहिल्या आठवड्यातील त्यांचा नियोजित जपान दौरा रद्द केल्याची माहिती आहे.
ताशी 200 किलोमीटर वेगाची रेल्वे
देशाचे स्वप्न असलेली बुलेट ट्रेन अद्याप दृष्टीक्षेपात नसली तरी, रेल्वेमंत्री सदानंद गौडा ताशी 200 किलोमीटर वेगाच्या रेल्वेची घोषणा करण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अरुणोंद्रकुमार आणि सदस्यांसमोर बुधवारी या सेमी हायस्पीड ट्रेनचे प्रेझेंटेशन देण्यात आले आहे. पहिली सेमी हायस्पिड ट्रेन दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता दरम्यान धावणार आहे. सुत्रांनी सांगितले, की जपानहून दोन ट्रेन मागवण्यात येणार आहेत. त्यांचा ताशी वेग 300 ते 350 किलोमीटर आहे. मात्र, भारतात हायस्पीड रेल्वे ट्रॅक नसल्यामुळे त्यांचा वेग 200 किलोमीटर प्रतितास राहाणार आहे.
रेल्वेमध्ये एफडीआयची योजना
केंद्र सरकारने निधी आभावी रेल्वेमध्ये एफडीआय आणण्याच्या दिशेने पाऊले टाकण्यास सुरवात केली आहे. या योजने अंतर्गत हायस्पीड रेल्वे आणि माल वाहतुकीसाठी आधुनिक पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. इंग्रजी दैनिक टाइम्स ऑफ इंडियाच्या वृ्त्तानुसार, अर्थ आणि उद्योग मंत्रालयाने रेल्वेच्या अनेक योजनांमध्ये ज्यात हायस्पीड रेल्वे, माल वाहतूक कॉरिडोर यात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आणि काही उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये 100 टक्के एफडीआयला मंजूरी देण्याचे प्रयत्न सुरु केल आहेत.