आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकपाल नियुक्तीची केंद्र सरकारची तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मनमोहनसिंग सरकारने कार्यकाळ पूर्ण होण्याआधी लोकपाल नियुक्तीची तयारी सुरू केली आहे. यासाठी 27 किंवा 28 एप्रिलला निवड समितीची बैठक होण्याची शक्यता आहे.

समितीत पंतप्रधानांसह विरोधी पक्षनेतेही सदस्य आहेत. विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज व्यग्रतेचे कारण पुढे करून बैठकीला अनुपस्थित राहू नयेत, असा पंतप्रधानांचा प्रयत्न आहे. त्यामुळेच दोन पर्यायी तारखा ठरवण्यात आल्या आहेत. लोकपालबाबत सरकार गंभीर असल्याचे भासवण्यासाठी सरकारचा हा प्रयत्न असून लोकपाल नियुक्त होऊ शकला तर सरकार र्शेय लाटेल. निर्णय झालाच नाही तर विरोधी पक्षांवर खापर फोडेल.

लोकपाल निवड समितीची यापूर्वीची बैठक गेल्या फेब्रुवारीत झाली होती. तेव्हा सरकारने पी. पी. राव यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होतज्ञ. मात्र, सुषमा स्वराज यांनी विरोध केला होता.