आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणीबाणीचा वर्धापन दिन, जेपींचे राष्ट्रीय स्मारक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकार बिहारमध्ये लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांच्या जन्मगावी राष्ट्रीय स्मारकाची उभारणी करणार आहे. जयप्रकाश यांचे जन्मगाव छपरा येथे ‘लाल का टोला’ नावाने हे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येईल. बुधवारी आणीबाणीचा ४० वा वर्धापन दिन साजरा करण्यात येईल. हे आैचित्य साधून केंद्र सरकारने ही घोषणा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक बोलावण्यात आली त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला. गृहमंत्री राजनाथसिंह यांनी याविषयी माहिती दिली. ‘लोकशाही आणि पंचायत राज्यात गांधीवादी विचारांचे स्थान’ या विषयीचे अध्ययन येथे केले जाईल. लोकनायक खादी गौरव संवर्धन केंद्राची उभारणी छपरा येथे करण्यात येईल. लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी आणीबाणीच्या दरम्यान, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविरुद्ध संपूर्ण क्रांतीची घोषणा केली होती. आतापर्यंत त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एकही स्मारक का उभारले गेले नाही, याविषयी गृहमंत्र्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सॅनफ्रान्सिस्को येथे याविषयी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आधुनिक काळात हुकूमशाहीला स्थान नाही. आता हुकूमशाही हद्दपार झाली आहे.

४० वर्षांपूर्वी १९ महिने हे चालले. मात्र आज घडीला अशी परिस्थिती उद््भवणे दुरापास्त असल्याचे जेटली म्हणाले. माध्यमे व सामान्य माणूसही आज जागरूक झाला आहे. दुसर्‍या आणीबाणीच्या आशंकेविषयी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी नुकतीच एक टिप्पणी केली होती. त्यावरून काँग्रेसने तीव्र आक्षेप नोंदवत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
बातम्या आणखी आहेत...