आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयविकारावरील उपचार स्वस्त, सरकारने स्टेंटच्या किमती 85 टक्क्यांपर्यंत केल्या कमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - हृदयविकार असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा देत सरकारने स्टेंटच्या किमती जवळपास 85 टक्क्यांनी कमी केल्या आहेत. नव्या किमतीनुसार आता मेटल स्टेंट्स 7260 रुपयांना तर बीव्हीएस (bioresorbable vascular scaffold) स्टेंट 29600 रुपयांना मिळणार आहे.
 
राष्ट्रीय औषधी मूल्य निर्धारण प्राधिकरण (NPPA) ने जारी केलेल्या अधिसूचनेच या स्टेंटच्या किमती वरीलप्रमाणे ठरवल्याचे स्पष्ट केले आहे. छोट्याशा नळीच्या आकाराचा हा स्टेंट हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिनीत बसवला जातो. या स्टेंटची बाजारातील किंमत ही 25,000 रुपयांपासून 1.98 लाखांपर्यंत होती. हॉस्पिटल या स्टेंटच्या माध्यमातून जवळपास 654 टक्के नफा कमवत होते, असे NPPA च्या बेवसाईटवरील माहितीवरून स्पष्ट होते. 
 
नफा कमावण्यासाठी अव्वाच्या सव्वा किमतीला स्टेंट विकण्यात येत असल्यामुळे रुग्णांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता. यावरून अनेकदा पेशंट आणि डॉक्टरांमध्ये मतभेदही निर्माण होत होते. त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी स्टेंटच्या किमती ठरवणे अत्यंत गरजेचे होते, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. तसेच अत्यावश्यक औषधींच्या राष्ट्रीय यादीमध्ये या कोरोनरी स्टेंट्सचा समावेश करण्यात आला आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...