आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्कराला 1.85 लाख रायफल्सची तातडीची गरज, सरकारने खरेदीच्या प्रक्रियेला दिला वेग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय लष्कराने देशात बनलेल्या असॉल्ट रायफल्सना नाकारल्यानंतर सरकारने आता नव्या रायफल्सच्या खरेदीची प्रक्रिया वेगवान केली आहे. लष्कराला 1.85 लाख असॉल्ट रायफल्सची तातडीची गरज आहे. सरकारी कंपनी रायफल फॅक्ट्री, ईशापूर येथे बनलेल्या रायफल्सना लष्कराने यापूर्वीच नाकारले होते. कारण त्यांची गुणवत्ता निश्चित दर्जानुसार नव्हती. 
 
असे आहे प्रकरण...
- लष्करात सध्या इन्सास रायफलचा वापर होतो. या रायफल खूप जुन्या झाल्या आहेत. सीमा सुरक्षा आणि दहशतवादी कारवायांच्या मानाने या रायफल आता तितक्या परिणामकारक ठरत नाहीयेत. बदलत्या काळानुसार गरजा तसेच समस्यांमध्येही बदल झाला असल्याने लष्कराने नव्या रायफल्सची मागणी केली होती.
- लष्कराला सध्या 7.62x51 mm रायफलची तातडीची गरज आहे. लष्कराने कमीत कमी 65 हजार रायफल त्वरित उपलब्ध करण्याविषयी सांगितले आहे. सीमा सुरक्षा आणि दहशतवादाला अटकाव करण्यासाठी यांची मोठी गरज असल्याचेही सांगण्यात आले आहे.
 
सध्या कुठपर्यंत आली आहे प्रक्रिया?
- संरक्षण मंत्रालयाने लष्कराच्या गरजेनुसार  उच्च गुणवत्ता दर्जा असणाऱ्या रायफल्सबाबत तातडीची पावले उचलली आहेत.
- वृत्तसंस्थेनुसार, संरक्षण मंत्रालयाने रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन म्हणजे आरएफआय जारी केली आहे. याअंतर्गत 20 बंदूक निर्मिती कारखान्यांनी अर्ज पाठवले आहेत. आता या अर्जांची छाननी सुरू आहे. यानंतर प्रक्रियेला खरा वेग येईल.
बातम्या आणखी आहेत...