आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Government To Let Pakistani Hindus Register As Citizens For As Low As Rs 100

पाकिस्तानी हिंदूंना आता भारतात पॅन, ‘आधार’ काढता येणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दीर्घकालीन व्हिसावर भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी हिंदू समुदायाला लवकरच भारतात मालमत्ता विकत घेण्यासोबतच बँक खातेही उघडण्याची परवानगी मिळू शकते. हा समुदाय भारतात पॅन व आधार कार्डही तयार करू शकेल.

भारताचा नागरिक होण्यासाठीचे नाेंदणी शुल्कही १५ हजार रुपयांवरून १०० रुपयांवर येऊ शकते. सरकारी अंदाजानुसार भारतात पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानातून आलले सुमारे २ लाख अल्पसंख्याक आहेत. त्यात बहुतांश हिंदू आणि शीख आहेत. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दिल्लीत या लोकांच्या सुमारे ४०० वस्त्या आहेत.
अटींवर या सुविधाही
> रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीविना बँक खाते उघडणे.
> निवासाला योग्य ठिकाण वा घर खरेदी करणे.
> स्वयंरोजगार वा व्यवसायासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड व वाहन परवाना.
> राहत असलेल्या राज्यात विनापरवानगी कुठेही येणे- जाणे.
> दीर्घकालीन व्हिसा दस्तऐवज एका राज्यातून दुसऱ्या राज्यात हस्तांतरित करणे.