आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Govt To Roll Out Cash Transfer Scheme On LPG Soon

पुढील महिन्‍यापासून थेट खात्‍यात जमा होणार गॅस सिलिंडरचे अनुदान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- थेट अनुदान खात्‍यात जमा करण्‍याच्‍या योजनेमध्‍ये केंद्र सरकार घरगुती गॅस सिलिंडरचाही समावेश करणार आहे. काही जिल्‍ह्यांमध्‍ये याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. तर आता पुढील महिन्‍यापासून याची व्‍याप्‍ती वाढविण्‍यात येणार आहे. या माध्‍यमातून सरकारला गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्‍यात यश मिळेल, अशी अपेक्षा आहे. तसेच 25 हजार रुपयांचे अनुदान वाचेल, असाही अंदाज आहे.

थेट अनुदान जमा करण्‍याच्‍या योजनेत पुढील टप्‍पा 20 जिल्ह्यात राबविण्‍यात येईल. यास 15 मे 2013 पासून सुरुवात करण्‍यात येणार आहे. टप्‍प्‍या टप्‍प्‍याने इतर जिल्‍ह्यांचा त्‍यात समावेश करण्‍यात येईल, अशी माहिती पेट्रोलियम मंत्रालयाने दिली. देशभरात सध्‍या 14 कोटी एलपीजी ग्राहक आहेत. ही योजना सुरु झाल्‍यानंतर ग्राहकांना एका सिलिंडरची किंमत एकरकमी द्यावी लागेल. अनुदानाची रक्‍कम त्‍यांच्‍या खात्‍यात जमा होईल.

कॉंग्रेसचे उपाध्‍यक्ष राहुल गांधी यांनी युवा कॉंग्रेस अध्‍यक्षांची एक समिती बनविली होती. केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांच्‍या मार्गदर्शनाखाली या समितीने काम केले. थेट अनुदान जमा करण्‍याच्‍या योजनेवर या समितीने अहवाल तयार केला. ही योजना सर्वप्रथम 22 जिल्‍ह्यात सुरु करण्‍यात आली होती.

या समितीने काही तांत्रिक अडचणी सांगितल्‍या. ग्रामिण भागात बँका खाते उघडून देण्‍यास त्रास देतात. विधवा पेन्‍शन किंवा इतर योजनेच्‍या लाभार्थ्‍यांना त्रास होतो. बँकांनी यामागे कारण सांगितले की, लाभार्थी लगेच सर्व पैसे काढून घेतात. त्‍यामुळे यावर एक उपाय सुचविण्‍यात आला. अशा लाभार्थ्‍यांचे खाते पोस्‍टामध्‍ये उघडावे. या खात्‍याशी त्‍यांचा आधार क्रमांक जोडलेला असेल.