आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांनी विचारले दाऊद कुठे आहे ? सरकार म्हणाले, आम्हाला माहीत नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अंडरवर्ल्ड डॉन आणि 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिमचा ठाव ठिकाणा भारत सरकारला माहित नाही. मंगळवारी संसदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात केंद्रीय गृह राज्यमंत्री हरिभाई प्रिथाभाई चौधरी यांनी सांगितले, 'दाऊद कुठे आहे याची सरकारला माहिती नाही. जेव्हा त्याचा ठाव ठिकाणा माहित होईल तेव्हा त्याच्या प्रत्यार्पणाची कारवाई सुरु केली जाईल.' विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच दिल्लीचे माजी पोलिस आयुक्त निरज कुमार यांनी दाऊद शरण येण्यास तयार होता, पण तत्कालिन सरकारने शेवटच्या क्षणी माघार घेतली होती.
संसदेत मंत्री महोदयांनी दिली माहिती
अंडरवर्ल्ड डॉन संबंधीच्या प्रश्नावर संसदेत गृह राज्यमंत्र्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहिम कासकर सध्या भारतीय तपास यंत्रणेच्या रडारवर नाही. तो कुठे आहे याबद्दल सरकारकडे कोणतीही माहिती नाही. ते म्हणाले, 'जेव्हा त्याचे लोकेशन कळेल तेव्हाच त्याच्या प्रत्यार्पणाची तयारी केली जाईल.' मुंबईत 12 मार्च 1993 रोजी साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात दाऊद मुख्य आरोपी आहे. मुंबईत 13 ठिकाणी झालेल्या स्फोटांमध्ये 257 लोक ठार आणि 700 जखमी झाले होते.
नीरज कुमार यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. त्या पार्श्वभूमीवर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दाऊद‍ इब्राहीमविषयी गौप्यस्फोट केला.
'डी-कंपनी'च्या नावाने दाऊद मुंबईत काळे धंदे करत होता. भारतासह अनेक देशात त्याचे जाळे पसरले आहे. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट मालिकेतील प्रमुख आरोपी आहे.
दाऊदला होती शत्रुंकडूनच भीती...
'जून 1994 मध्ये दाऊद इब्राहिमने माझ्याशी तीनदा चर्चा केली होती. तो आत्मसमर्पण करण्याच्या विचारात होता. परंतु, त्याच्या मनात एक भीतीही होती. ती म्हणजे, तो भारतात आला तर त्याचे शत्रु त्याला जिवंत ठेवणार नाहीत. मात्र, मी त्याला सुरक्षा देण्याचे आश्वासनही दिले. भारतात त्याच्या सुरक्षेची जबाबदारी सीबीआयची असेल, परंतु, तो ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हता', असे नीरज कुमार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.
वरिष्ठांनी दिला नव्हता निर्णय...
दाऊदसोबत फोनवर चर्चा सुरु होती. तो आत्मसमर्पण करणार होता. यासंदर्भात वरिष्ठांना देखील माहिती देण्यात आली होती. परंतु, वरिष्ठ अधिकार्‍यांनी याबाबत कोणताही निर्णय दिला नाही. उलट दाऊदसोबत सुरु असलेली चर्चा थांबवण्यास सांगितले. त्या काळात पीव्ही नरसिंह राव हे पंतप्रधान होते. दिल्ली पोलिस आयुक्तपदावरून नीरज कुमार जुलै 2013मध्ये सेवानिवृत झाले. नंतर कुमार यांनी मुंबई 12 मार्च 1993 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या सीबीआय चौकशीचे नेतृत्त्व केले.
पुढील स्लाइडवर वाचा, ज्येष्ठ विधीज्ञ राम जेठमलानी यांनीही केला होता दावा