आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Govt Wants Stand New 20 IIT College On Semi Govt

सरकारी-खासगी भागीदारीत देशभरात आणखी 20 नवी आयआयआयटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशभरात वीस 'आयआयटी' (माहिती-तंत्रज्ञान संस्था) स्थापन करण्यासंबंधीचे विधेयक सोमवारी लोकसभेत मांडण्यात आले. सध्या अस्तित्वात असलेल्या चार आयआयआयटींना राष्ट्रीय दर्जा देण्याची तरतूदही यात आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत सरकारी व खासगी भागीदारीतून या संस्था स्थापन करण्यात येतील.

संस्था स्थापन करण्यामागे माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक दर्जाचे मनुष्यबळ निर्माण करण्याचा प्रमुख हेतू असल्याचे मनुष्यबळ विकासमंत्री एम. एम. पल्लम राजू यांनी सांगितले. या सर्व संस्थांना प्रशासकीय स्वायत्तता देण्यात येणार आहे. तसेच ग्वाल्हेर, अलाहाबाद, जबलपूर आणि कांचीपुरम येथील आयआयआयटींना राष्ट्रीय दर्जा देण्यासंबंधीची तरतूद यात आहे. संस्था उभारणीसाठी 128 कोटी खर्च अपेक्षित असून केंद्र सरकार यातील निम्मा वाटा उचलेल. संबंधित राज्य सरकारे 35 टक्के आणि भागीदार उद्योग 15 टक्के वाटा उचलणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक राज्यात किमान एक अशी संस्था स्थापन करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना संस्थांत भागीदारीची परवानगी दिलेली आहे.