आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Govt's Move To Lower Age Of Consent To 16 From 18 Years Runs

मुलांना संबंधांची परवानगी देणे घातक ठरेल : पर्सनल लॉ बोर्ड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - परस्पर संमतीने 16 वर्षांच्या मुलांना शारीरिक संबंधांचा अधिकार देण्याचा केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांचा युक्तिवाद मुस्लिम समाजाने फेटाळला आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा हवाला देऊन मोईली यांनी शुक्रवारी म्हटले होते की, त्यातही विवाहाचे वय 15 वर्षे आहे.

सरकारने हा प्रस्तावच मागे घेतला पाहिजे, अशी मागणी जमात-ए-हिंद, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, मुस्लिम मजलिस मुशव्वरत या संघटनांनी शनिवारी केली. शारीरिक संबंधांसाठी 16 वष्रे वयोर्मयादा निश्चित करणे कुटुंबव्यवस्था तसेच समाजाच्या दृष्टीने घातक असून या मुलांना तसा कायदेशीर अधिकार दिल्याने गंभीर परिणाम होतील, असे या संघटनांचे म्हणणे आहे. मुस्लिम मजलिस मुशव्वरतचे मौलाना अली अहमद काझी यांनी म्हटले आहे की, कोणताही निर्णय घेताना सरकारने त्याचे सामाजिक दुष्परिणाम पडताळले पाहिजेत. हा निर्णय समाजासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे अब्दुल रहीम कुरेशी म्हणाले. दुसरीकडे हरियाणात कंडेला, ‘सर्व जाट’सह अनेक खाप पंचायतींनी हा निर्णय सरकारने तातडीने रद्द करावा, असे आवाहन केले आहे. तसे पत्र पंचायती पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना पाठवणार आहेत.


13 विरोधी पक्षांचा विधेयकाला विरोध करण्याचा निर्धार
भाजप नेते अरुण जेटली, व्यंकय्या नायडू, जसवंतसिंग यांनी विधेयकाला विरोध करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे.

एनडीए घटक पक्ष शिवसेना, अकाली दल, जदयूही विरोधात. शरद यादव म्हणाले - यामुळे तरुणाईची दिशा भरकटेल. शिवसेनेचे दिवाकर रावते म्हणाले, यावर गांभीर्याने चर्चा होणे अत्यंत गरजेचे आहे.

युपीए-एनडीए बाहेरच्या पक्षांपैकी टीडीपी, झारखंड मुक्ती मोर्चा, झारखंड विकास मोर्चा, डावे पक्ष, हरियाणा जनहित काँग्रेस, लोकदल, मनसेदेखील वय घटवण्याविरुद्ध.

कुलदीप बिश्नोई म्हणाले, यामुळे अत्याचाराच्या घटना वाढतील.

सपाचे सरचिटणीस रामगोपाल यादव यांनीही बौद्धिक दिवाळखोरी संबोधत विरोधाचा सूर आळवला.

बसपनेही असहमती दर्शवली आहे.

राष्ट्रीय विकास परिषद बैठकीत चर्चा करा
संबंधांचे वय कमी करणारा कायदा केंद्रात बसलेल्या लोकांसाठी नाही. हा देशाचा प्रश्न आहे. तो लागू करण्यापूर्वी राष्ट्रीय विकास परिषदेची बैठक बोलावण्यात यावी. - रमणसिंह, मुख्यमंत्री, छत्तीसगड

लग्न 18, संबंध 16 व्या वर्षी, हा कसला कायदा?
16 वर्षाच्या मुलांना चांगले-वाईट कळले असते तर मतदानाचा अधिकार याच वयात का देत नाहीत? लग्न 18 व्या वर्षी आणि लैंगिक संबंध 16 व्या वर्षी हा कसला कायदा? -शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री, मध्य प्रदेश