आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: दिल्लीचा पदविधर झाला भिकारी, 2 तासांत कमवले 200 रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नोकरी मिळवून देणारे शिक्षण असावे यावर सध्या भर दिला जात आहे. पण तरीही पदवी घेतल्यावर लगेच चांगली नोकरी मिळत नाही. त्यासाठी कुठेतरी ट्रेनी म्हणून तोकड्या पगाराची नोकरी स्विकारावीच लागते. पण दिल्लीच्या एका पदविधराने नोकरीपेक्षा भीक मागणे किती फायद्याचे आहे हे सिद्ध करुन दिले आहे. यात स्वाभिमान गहाण टाकावा लागतो. पण आर्थिक कमाई होते. त्याने दोन तासांत चक्क 200 रुपये कमावले. अशा प्रकारे नोकरीचे तास आणि महिन्याचा हिशोब लावला तर आकडा 30 हजार रुपयांवर जातो.
भिकारी दिसला की आपण सहज त्याला पैसे देतो. आधी भिकारी एक-दोन रुपये सहज घेत होते. पण आता त्यांची मागणीही वाढली आहे. पाच किंवा दहा रुपये दिले तरच ते स्विकारतात. पुण्या-मुंबईतील अतिश्रीमंत भागात तर भिकारी हमखास नजरेस पडतात. येथील भिकारी केवळ श्रीमंत लोकांना भीक मागतात. इतरांकडे साधे बघतही नाहीत. हे भिकारी किती कमवत असतील याचा अंदाज न लावलेलाच बरा.
दिल्लीच्या एका पदविधराने एक नामी युक्ती योजली. त्याने भिकाऱ्यासारखा गेटअप केला. रस्त्यावर भिक मागितली. त्याला दोन तासांत दोनशे रुपये मिळाले. अशी बक्कळ कमाई त्याने करुन दाखवली. सरकारी नियमांप्रमाणे त्याने आठ तास काम केले तर 1600 रुपये दिवसाला मिळतात. याप्रमाणे मासिक उत्पन्न चक्क 30 हजार रुपयांवर जाते.
पुढील स्लाईडवर बघा, या पदविधराने कसा बदलला वेश, दोन तासांत कमवले 200 रुपये... असा कारमधून भिक मागण्यासाठी उतरला पदविधर...
बातम्या आणखी आहेत...