आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंचन घोटाळा: १७ वर्षांपूर्वीच्या भ्रष्टाचारप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री थुंगन दोषी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- माजी केंद्रीय मंत्री पी. के. थुंगन यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने मंगळवारी १७ वर्षांपूर्वीच्या एका भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरवले. न्यायालयाने निकाल देताच थुंगन यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. ६९ वर्षीय थुंगन यांच्या व्यतिरिक्त इतर तिघांनाही या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे.

अन्य तीन दोषींमध्ये ए. ओ. तली, सी. संगीत आणि महेश माहेश्वरी यांचा समावेश आहे. यांची रवानगीही थुंगन यांच्यासोबत तुरुंगात करण्यात आली. भ्रष्टाचारिवरेाधी कायदा व भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार दाखल गुन्ह्यांमध्ये हे सर्व दोषी आढळले आहेत. निकाल लागला तेव्हा हे सर्व आरोपी न्यायालयात हजर होते. या सर्वांना २७ जुलै रोजी शिक्षा जाहीर केली जाईल. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेेल थुंगन पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात शहरी विकास व रोजगार राज्यमंत्री होते. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. थुंगन व इतर दोषींवर नागालँडमधील लघुसिंचन प्रकल्पासाठी नियोजन आयोगातर्फे देण्यात आलेल्या २ कोटी रुपयांच्या निधीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता. हे दोन कोटी एक-एक कोटी याप्रमाणे दोन टप्प्यात देण्यात आले होते. यात गैरप्रकार झाल्याचे नंतर उघडकीस आले होते.

माजी कोळसा राज्यमंत्री, माजी सचिवांना समन्स
कोळसा खाण घोटाळा प्रकरणी न्यायालयाने मंगळवारी माजी कोळसा राज्यमंत्री संतोष बगरोदिया आणि माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता यांना समन्स जारी केले. आरोपी म्हणून त्यांना १८ ऑगस्टला कोर्टात हजर राहावे लागणार आहे. विशेष सीबीआय न्यायाधीश भरत पराशर यांनी महाराष्ट्रातील बांदर कोळसा खाणवाटपात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या अंतिम अहवालाची दखल घेत दोघांवर आरोप निश्चित केले हाेते. या प्रकरणी निवृत्त सरकारी अधिकारी एल. एस. जनोती यांनाही समन्स काढण्यात आले आहे. एएमआर आयर्न अँड स्टील कंपनीला त्यांनी कोळसा खाणपट्टा दिला होता. न्यायालयाने म्हटले होते की, बगरोदिया, गुप्ता व जनोती यांनी एएमआर आयर्न अँड स्टील कंपनीला कोळसा खाणपट्टा मिळवून देण्यात मदत केली होती.

स्मरणपत्रानंतरही खटल्यास मंजुरी नाही
सीबीआयने न्यायालयात नमूद केले आहे की, वारंवार स्मरणपत्र पाठवूनही सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दोन अधिकाऱ्यांवर खटला चालवण्यासाठी मंजुरी दिली नाही.

आयकरप्रकरणी स्पाइसजेट, मारन यांना समन्स
स्पाइसजेट एअरलाइन्स आणि कंपनीचे तत्कालीन चेअरमन कलानिधी मारन यांच्यासह तिघांना दिल्ली कोर्टाने समन्स जारी केले आहेत. १४७ कोटी रुपयांचा आयकर चुकवल्याप्रकरणी एअरलाइन्सचे तत्कालीन एमडी एस. नटराजन यांचा तिसरे आरोपी म्हणून समावेश आहे. तिघांनाही २१ ऑगस्टपर्यंत न्यायालयात हजर राहण्यास बजावण्यात आले आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रीतम सिंह यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...