आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 डिसेंबर रोजी शरद पवारांचा B\'Day; दिल्लीत आज, मुंबईत शनिवारी सेलिब्रेशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी 75 वा वाढदिवस आहे. - Divya Marathi
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी 75 वा वाढदिवस आहे.
नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षप्रमुख शरद पवार यांच्या वाढदिवसाचे (12 डिसेंबर) ग्रँड सेलिब्रेशन करण्याची योजना आखली आहे. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजधानीत हे सेलिब्रेशन होणार आहे. यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेते सहभागी होणार आहेत.

दिल्लीत आज तर मुंबईत 12 डिसेंबरला पार्टी
- दिल्लीतील विज्ञान भवन येथ आज (10 डिसेंबर) दुपारी 4 वाजता एका स्पेशल कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींपासून अनेक नेते सहभागी होतील. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे देखिल सहभागी होण्याची शक्यता आहे.
- महाराष्ट्रात सध्या उपराजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेश सुरु आहे. मात्र राष्ट्रवादीचे बहुतेक सर्व आमदार आणि नेते दिल्लीला गेले आहेत.
- 12 डिसेंबर रोजी मुंबईतील नेहरु सेंटर येथे पवारांचा वाढदिवस साजरा केला जाईल.

कोण-कोण येण्याची शक्यता
- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि उपराष्ट्रपती हामिद अन्सारी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग
- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या कार्यक्रमाला येण्याची शक्यता धुसर आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणामुळे काँग्रेस सध्या चिंतीत आहे.
- लालू प्रसाद यादव, मुलायमसिंह यादव आणि इतरही काही पक्षांचे प्रमुख.
- सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पवारांच्या वाढदिवसाचे निमंत्रण. त्यात नितीशकुमार, प्रकाशसिंह बादल, देवेंद्र फडणवीस यांचा समावेश.
- उद्योगपती रतन टाटा, मुकेश अंबानी, अनिल अंबानी, आदित्य बिर्ला आणि आदि गोदरेज यांसारखे बडे उद्योजकांचा समावेश आहे.

दिल्लीत काय होणार
शरद पवार यांच्या जीवनावर लिहिलेले 'ऑन माय टर्म्स' या पुस्तकाचे प्रकाशन होईल. हे पुस्तक इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेत प्रकाशित होणार आहे. याच्या मराठी आवृत्तीचे नाव 'लोक माझे सांगाती' आहे. या पुस्तकात पवारांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याच्या अनुभवाबद्दल भाष्य करण्यात आल्याचे सांगितले जाते. 400 पानांच्या या पुस्तकात 40 पानांवर फक्त फोटोज आहेत.
बातम्या आणखी आहेत...