आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलाम जिद्दीला : 64 वर्षांच्या डायना सलग 53 तास पोहल्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विक्रम : शार्कपासून बचावाचा पिंजरा व फ्लिपर्सशिवाय फ्लोरिडा खाडी पूर्ण करणारी पहिली महिला
वृत्तसंस्था/ की वेस्ट (फ्लोरिडा) । अमेरिकीची 64 वर्षीय महिला जलतरणपटू डायना नेयाद यांनी क्युबा ते फ्लोरिडा खाडीपर्यंत 176 कि. मी. सागरी अंतर पोहून विक्रम रचला. त्यांनी शार्कपासून बचाव करण्याचा पिंजरा किंवा फ्लिपर्सचा पोहताना वापर केला नाही. डायनाने 35 वर्षांमध्ये पाच वेळेस सागरी मार्गाने क्युबातून फ्लोरिडापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता.


डायनाला 21 ऑगस्ट 2012 रोजी अटलांटिक महासागरातून वाचवले होते. त्या क्युबा ते फ्लोरिडा हे 177 कि. मी. अंतर पोहून पूर्ण करत होत्या. अर्ध्या वाटेत असताना त्यांच्या जिभेवर जेलिफिशने दंश केला होता. त्यांनी त्यानंतरही पोहणे सुरूच ठेवले. मात्र, पुढे वादळाने त्यांचा मार्ग अडवला. 1950 पासून आतापर्यंत शार्कच्या हल्ल्यापेक्षा जेलिफिशच्या दंशामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.